India tour of New Zealand 2022 : टीम इंडिया पोहचली न्यूझीलंडमध्ये, हार्दिक-केनचं ट्रॉफीसोबत खास फोटोशूट, दौऱ्याची सर्व माहिती एका क्लिकवर
India tour of New Zealand 2022: टी-20 विश्वचषकानंतर आता टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारत मर्यादीत षटकांचे सामने खेळणार आहे.
IND vs NZ, T20 Cricket : भारतीय संघ (Team India) आता न्यूझीलंड दौऱ्यावर (India tour of New Zealand) असून टी20 विश्वचषकानंतर लगेचच टीम इंडिया मैदानात उतरत आहे. भारताचं नेतृत्त्व हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्याकडे असणार आहे. तर न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) हाच असेल. दरम्यान शुक्रवार अर्थात 18 नोव्हेंबरपासून सामन्यांना सुरुवात होणार असून त्यापूर्वी दोन्ही कर्णधारांनी ट्रॉफीसोबत खास फोटोशूट केलं आहे. एक अगदी सुंदर अशी ट्रॉफी दिसत असून दोघेही एका खास प्रकारच्या सायकलची सैर करताना दिसत आहेत. स्पर्धेत आधी 3 टी20 आणि नंतर 3 वन डे सामने होणार असून पहिला सामना वेलिंग्टनच्या मैदानावर रंगणार असून त्याठिकाणीच हे फोटो शूट करण्यात आलं आहे. तर या दौऱ्याचं वेळापत्रक तसंच सामन्यांसंबधी सर्व माहिती पाहूया...
Did anyone say Captains' photoshoot? 📸
— BCCI (@BCCI) November 16, 2022
That's Some Entry! 😎 #TeamIndia | #NZvIND pic.twitter.com/TL8KMq5aGs
कधी, कुठं रंगणार सामने?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना 18 नोव्हेंबर रोजी वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर खेळला जाईल. त्यानंतर दुसरा टी-20 सामना 20 नोव्हेंबर आणि तिसरा टी-20 सामना 22 नोव्हेंबर रोजी अनुक्रमे माउंट मॉन्गनुई आणि नॅपियर येथे खेळला जाईल. दरम्यान, एकदिवसीय मालिकेला 25 नोव्हेंबर ईडन पार्क येथे होईल. त्यानंतर दुसरा एकदिवसीय सामना 27 नोव्हेंबर रोजी सीडन पार्क आणि तिसरा एकदिवसीय साममना 30 नोव्हेंबर रोजी हेग्ले ओवल येथे पार पडणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेच वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 18 नोव्हेंबर | वेलिंग्टन |
दुसरा टी-20 सामना | 20 नोव्हेंबर | माउंट मॉन्गनुई |
तिसरा टी-20 सामना | 22 नोव्हेंबर | नॅपियर |
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 25 नोव्हेंबर | ऑकलँड |
दुसरा एकदिवसीय सामना | 27 नोव्हेंबर | हेमिल्टन |
तिसरा एकदिवसीय सामना | 30 नोव्हेंबर | क्राइस्टचर्च |
टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ:
हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ:
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, शहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
हे देखील वाचा-