ENG vs IND: इंग्लंडचा संघ अडचणीत! जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यानंतर मोहम्मद सिराजचा कहर
ENG vs IND: बर्मिंगहॅम (Birmingham) कसोटी सामन्यावर भारतीय संघानं मजूबत पकड बनवली आहे. पहिल्या डावात 416 धावांची मोठी धावसंख्या उभारल्यानंतर भारतानं इंग्लंडला 284 धावांत गुंडाळलं.
ENG vs IND: बर्मिंगहॅम (Birmingham) कसोटी सामन्यावर भारतीय संघानं मजूबत पकड बनवली आहे. पहिल्या डावात 416 धावांची मोठी धावसंख्या उभारल्यानंतर भारतानं इंग्लंडला 284 धावांत गुंडाळलं. इंग्लडच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत इंग्लडच्या संघाला अचडणीत टाकलंय. कर्णधार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद सिराजच्या (Mohammed Siraj) उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर भारतानं 132 धावांची आघाडी मिळवली. तिसऱ्या दिवसाअखेर भारतानं तीन विकेट्स गमावून 257 धावांची आघाडी घेतलीय.
बुमराहकडून इंग्लंडची टॉप ऑर्डर उद्धवस्त
इंग्लंडच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहनं टॉप ऑर्डर उद्ध्वस्त करत इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं. जसप्रीत बुमराहनं दुसऱ्या दिवशीच अॅलेक्स लीस, जॅक क्रॉली आणि ऑली पॉपला माघारी धाडत इग्लंडला अडचणीत टाकलं. बुमराहच्या या स्पेलमुळं इंग्लंडच्या संघानं अवघ्या 83 धावांवर पाच विकेट्स गमावले. या डावात जसप्रीत बुमराहनं 19 षटकात 68 धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या.
मोहम्मद सिराजचा इंग्लंडच्या खालच्या फळीवर हल्ला
कर्णधार बुमराहने टॉप ऑर्डरला लक्ष्य केलं. त्यानंतर मोहम्मद सिराजनं कहर केला. मोहम्मद सिराजनं आपल्या स्पेलमध्ये फक्त 11.3 षटकात चार विकेट्स घेतल्या आणि 66 धावा दिल्या. मोहम्मद सिराजनं जो रुटला माघारी धाडल्यानंतर इंग्लडच्या खालच्या फळीवर हल्ला केला.सिराजनं स्टुअर्ट ब्रॉड, सॅम बिलिंग्ज, मॅथ्यू पॉट्स यांच्या विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्याशिवाय मोहम्मद शमीला दोन आणि शार्दुल ठाकूरला एक विकेट मिळाली.
हे देखील वाचा-