एक्स्प्लोर

ENG vs IND: पुजारासारखा खेळणारा जॉनी बेअरस्टो विराटच्या स्लेजिंगमुळं पंत बनला- वीरेंद्र सेहवाग

India tour of England: बर्मिंगहॅमच्या (Birmingham) एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर (Edgbaston) सुरु असलेल्या रिशेड्युल कसोटी सामना रोमांचक वळणावर पोहचला आहे.

India tour of England: बर्मिंगहॅमच्या (Birmingham) एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर (Edgbaston) सुरु असलेल्या रिशेड्युल कसोटी सामना रोमांचक वळणावर पोहचला आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघ मजबूत स्थितीत दिसत आहे. भारतानं दुसऱ्या डावात 257 धावांची आघाडी मिळवली आहे. दरम्यान, इंग्लंडच्या पहिल्या डावात जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) शतक झळकावून संघाचा डाव पुढं नेला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या  (Virat Kohli) स्लेजिंगमुळं पुजारासारखा खेळणारा जॉनी बेअरस्टो पंत बनला, असं वक्तव्य भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं (virender Sehwag) केलंय. 

वीरेंद्र सेहवाग काय म्हणाला?
बर्मिंगहॅम कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. पण विराट कोहलीसोबतच्या लढतीनंतर जॉनी बेअरस्टोची फलंदाजीची भूमिका पूर्णपणे बदलल्याचे सेहवागनं म्हटलं आहे. "विराट कोहलीनं स्लेजिंग करण्यापूर्वी जॉनी बेअरस्टोचा स्ट्राइक रेट 21 होता, पण स्लेजिंगनंतर 150 झाला, विनाकारण स्लेजिंग करून विराट कोहलीनं पुजारा सारख्या खेळणाऱ्या जॉनी बेअरस्टोला पंत बनवले", असं सेहवागनं ट्विटरच्या माध्यमातून म्हटलंय. 

वीरेंद्र सेहवागचं ट्वीट-

जॉनी बेअरस्टोचं शतक
बर्मिंगहॅम कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला जॉनी बेअरस्टोनं 60 चेंडूत फक्त 13 धावा केल्या होत्या. परंतु, विराटसोबत झालेल्या वादानंतर त्यानं  53 चेंडूत 73 धावा केल्या. काही वेळातच जॉनी बेअरस्टोचा स्ट्राइक रेट 150 च्या पुढं गेला. जॉनी बेअरस्टोनं या डावात 14 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 106 धावा केल्या.

जॉनी बेअरस्टो इंग्लंडसाठी तारणहार ठरला
या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 416 धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या इंग्लंडचा पहिला डाव 284 धावांवर संपुष्टात आला. जॉनी बेअरस्टोच्या शतकाशिवाय इंग्लंडला एकाही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

हे देखील वाचा- 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली
Akshay Kumar Car Accident : जूहूत 3 गाड्यांचा अपघात, अपघातग्रस्त रिक्षाची अक्षय कुमारच्या कारला धडक
Samadhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
Pune Shivsena UBT: सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
Prashant Jagtap: मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
Sahar Shaikh MIM TMC Election 2026: आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार MIM चा असेल; जितेंद्र आव्हाडांना ललकारणारी सहर शेख कोण?
आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार MIM चा असेल; जितेंद्र आव्हाडांना ललकारणारी सहर शेख कोण?
Embed widget