Jonny Bairstow Vs Virat Kohli: विराट कोहलीसोबत झालेल्या वादावर जॉनी बेअरस्टोची प्रतिक्रिया
England vs India Rescheduled match: बर्मिंगहॅमच्या (Birmingham) एजबॅस्टन (Edgbaston) येथे खेळल्या जात असलेल्या भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात वादविवादनं झाली.
England vs India, 5th Test Rescheduled match: बर्मिंगहॅमच्या (Birmingham) एजबॅस्टन (Edgbaston) येथे खेळल्या जात असलेल्या भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात वादविवादनं झाली. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) यांच्यात पहिल्या सत्रात बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर पंचानी मध्यस्ती करत वाद मिटवला. याच वादावर जॉनी बेअरस्टो आपली प्रतिक्रिया दिली आहे.
जॉनी बेअरस्टो काय म्हणाला?
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर बेअरस्टो म्हणाला की, "आम्ही 10 वर्षांपासून एकमेकांविरुद्ध खेळत आहोत. ही एक मजेदार गोष्ट आहे. आम्ही कसोटी क्रिकेट खेळत आहोत आणि आम्ही दोघेही प्रतिस्पर्धी आहोत. प्रत्येकाला आपलं सर्वोत्तम द्यायचं आहे. तुम्हाला तुमच्या संघाला खेळात पुढं घेऊन जायचं आहे आणि त्यासाठी जे काही आवश्यक आहे ते करावं लागतं. तो एक खेळाचा भाग आहे."
नेमकं काय घडलं?
बर्मिंगहॅम कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर काही वेळातच विराट कोहली जॉनी बेअरस्टोशी भिडल्याचं पाहायला मिळालं. इंग्लंडच्या पहिल्या डावातील 32 व्या षटकात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी गोलंदाजी आला. या षटकातील पहिला चेंडू टाकल्यानंतर विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात बाचाबाची झाली. या दरम्यान दोन्ही खेळाडूंमध्ये थोडीशी बाचाबाची झाली आणि नंतर दोघेही वेगळे झाले. त्यानंतर पंचानी मध्यस्ती करत विराट कोहली आणि इंग्लंडच्या दोन्ही फलंदाजांशी संवाद साधला.
व्हिडिओ-
It's tense out there between Virat Kohli and Jonny Bairstow 😳#ENGvIND pic.twitter.com/3lIZjERvDW
— Sky Sports Cricket (@SkyCricket) July 3, 2022
हे देखील वाचा-