Birthday Special | जसप्रीत बुमराहसह ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या टीम इंडियातील 'या' शिलेदारांचा आज वाढदिवस
Birthday Special | ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील तीन खेळाडू आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, रविंद्र जाडेजा आणि मधल्या फळीत खेळणारा फलंदाज श्रेयस अय्यर या तिघांचा आज वाढदिवस आहे.
Birthday Special : गेल्या काही वर्षात आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केलेल्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आज आपला 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. सोबत रविंद्र जडेजा आपला 32 वा, तर श्रेयस अय्यर आपला 26 वा वाढदिवस साजरा करत आहे. जसप्रीत बुमराहने आपल्या एकदिवसीय क्रिकेट करियरची सुरुवात 2016 साली ऑस्ट्रेलियाविरोधात केली होती. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. जसप्रीत बुमराहने गोलंदाजीच्या आपल्या वेगळ्या शैलीने जगभरातल्या क्रिकेटप्रेमींना भूरळ घातली. आतापर्यंत 67 एकदिवसीय सामने खेळणाऱ्या बुमराहने 108 बळी घेतले आहेत. बुमराहने आपल्या कसोटी करियरची सुरुवात 2018 साली दक्षिण आफ्रिकेविरोधात केली होती. या व्यतिरिक्त बुमराहने टी20 सामन्यातही आपली छाप उमटवली आहे. आयपीएलच्या सामन्यात त्याने शानदार प्रदर्शन केलं आहे.
श्रीलंकेविरोधात 2009 साली आपल्या करियरची सुरुवात करणारा रविंद्र जडेजा आज 32 वर्षाचा झाला आहे. रविंद्र जडेजाने आपल्या खेळाने जगातल्या सर्वात चांगल्या स्पीन ऑलराउंडर खेळांडूंच्या यादीत स्थान पक्कं केलं आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत 49 कसोटी, 168 एकदिवसीय आणि 50 टी20 सामने खेळले आहेत. रविंद्र जाडेजाने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही प्रकारात आपला ठसा उमटवला आहे. सोबतच तो आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो.
न्यूझीलंडविरोधात 2017 साली टी20 सामन्याच्या माध्यमातून आपल्या करियरची सुरुवात करणारा श्रेयस अय्यर आज आपला 26 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आयपीएलमध्ये केलेल्या प्रदर्शनामुळे त्याला टीम इंडियात खेळायची संधी मिळाली. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन अनेक चांगल्या खेळी खेळल्या आहेत. श्रेयस अय्यरने आतापर्यंत 21 एकदिवसीय सामने आणि 22 टी20 सामने खेळले आहेत. त्याने आतापर्यंत 1200 पेक्षा अधिक धावा केल्या आहे. न्युझीलंडच्या दौऱ्यात श्रेयस अय्यरने दमदार प्रदर्शन केलं होतं.
या तीन खेळाडंच्या व्यतिरिक्त करुण नायर आणि भारताचा माजी वेगवान गोलंदाज आर.पी. सिंग यांचाही आज वाढदिवस आहे.
महत्वाच्या बातम्या: