एक्स्प्लोर

World Cup Squad 2023 : विश्वचषकात टीम इंडियासाठी फिरकी गोलंदाजीच ठरणार कमकुवत बाजू?

India ODI World Cup Squad 2023 : विश्वचषक स्पर्धा 2023 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजीबाबत आताच प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

मुंबई भारतात 2011 मध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने अजिंक्यपद पटकावले. कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने विश्वचषक जिंकला. या विश्वचषकात भारतीय गोलंदाजी अतिशय प्रभावी ठरली होती. त्यात फिरकीपटूंनी मोलाची कामगिरी बजावली होती. मात्र, यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय फिरकी गोलंदाची यशस्वी ठरेल का, असे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. फिरकीत वैविध्य नसल्याचा फटका बसू शकतो, अशी भीती चाहते व्यक्त करत आहेत. 

2011 चा विश्वचषक भारतामध्ये झाला होता. धोनीच्या नेतृत्वात भारताने विश्वचषकावर नाव कोरले होते. या विजयात फिरकी गोलंदाजांचा मोठा वाटा होता. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी 2011 च्या विश्वचषकात एकूण 34 विकेट घेतल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक विकेट युवराज सिंह याच्या नावावर होत्या. युवराज याने 9 सामन्यात 15 विकेट घेतल्या होत्या. तर हरभजन सिंह याने नऊ विकेट घेतल्या होत्या. त्याशिवाय अश्विन आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी चार चार विकेट घेतल्या होत्या. सुरेश रैना आणि युसुफ पठाण यांना एक एक विकेट मिळाली होती. ऑफ स्पिनरने 15 पेक्षा जास्त विकेट घेतल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. 

आताच्या संघाचा विचार करता भारतीय फिरकी गोलंदाजी कमकुवत असल्याचे दिसतेय. भारताने कुलदीप यादव हा एकमेव फिरकी स्पेशालिस्ट घेतलाय. रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल त्यांच्या जोडीला आहेत. पण हे दोन्ही गोलंदाज एकाच धाटणीचे आहेत. 2011 च्या विश्वचषकात भारताकडे अश्विन, हरभजन, पियुष चावला आणि युवराज सिंह असे विविधता असणारे फिरकी गोलंदाज होते. प्रत्येक गोलंदाजाची शैली आणि ताकद वेगळी होती. पण सध्या भारताकडे फिरकीचे फक्त तीन पर्याय असल्याचे दिसतेय. आघाडीचा कोणताही फलंदाज गोलंदाजी करत नाही. त्यामुळे भारतीय संघाकडे मर्यादा असल्याचे स्पष्ट होतेय. याचाच फायदा प्रतिस्पर्धी संघ घेऊ शकतात. 

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तान संघात भरभरुन डावखुरे फलंदाज आहेत. डावखुऱ्या फलंदाजाविरोधात ऑफ स्पिन गोलंदाजी प्रभावी ठरते, हे काही नव्याने सांगायची गरज नाही. असे असतानाही टीम इंडियात एकाही ऑफ स्पिनरला स्थान देण्यात आलेलं नाही. इतकेच काय टीम इंडियात लेग स्पिनरही घेतला नाही. रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल मधल्या षटकात डावखुऱ्या फलंदाजाविरोधात किती प्रभावी गोलंदाजी करु शकतील, याबाबत शंकाच आहे. या दोघांपैकी एकालाही मार पडला तर गोलंदाजीचे गणित बिघडू शकते. 

2011 च्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीने घेतल्या होत्या. शाहीद आफ्रिदी आणि युजवेंद्र चहल एकाच धाटणीचे गोलंदाज आहेत. दोघेही लेगस्पिनर आहेत. पण चहल सोडा... अश्विनसारख्या अनुभवी गोलंदाजाला का संधी मिळाली नाही, याची सध्या चर्चा सुरू आहे. 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा तो सदस्य होता. अश्विन तळाला चांगली फलंदाजीही करु शकतो. त्याशिवाय भारतीय खेळपट्टीवर अश्विनसारखा दुसरा प्रभावी गोलंदाज नाही. पॉवरप्लेमध्येही गोलंदाजी करण्याची क्षमता अश्विनकडे आहे. त्याशिवाय तो फलंदाजीतही निपुण असल्याचे अनेकदा सिद्ध केलेय. पण अश्विनलाही संधी मिळाली नाही. 

2011 विश्वचषकात फिरकीची कमाल पाहायला मिळाली होती. संपूर्ण स्पर्धेत जवळपास 47 टक्के चेंडू फिरकी गोलंदाजांनी टाकले होते. स्पर्धेतील 11 हजार 901 चेंडू फिरकी गोलंदाजांनी टाकले होते. 2011 च्या विश्वचषकात 43 टक्के विकेट फिरकी गोलंदाजांनी घेतल्या होत्या. स्पर्धेतील 290 विकेट फिरकी गोलंदाजांनी घेतल्या होत्या.  2011 च्या विश्वचषकात भारतीय फिरकी गोलंदाजी प्रभावी नव्हती... पण तरिही 34 विकेट घेतल्या होत्या. हरभजन सिंह आणि युवराज या जोडीने कमाल केली होती. त्यांच्या जोडीला अश्विन, चावला, रैना यासारखे पर्याय होते. यंदाच्या विश्वचषकात भारताच्या फिरकी गोलंदाजीचा भार कुलदीप, जाडेजा आणि अक्षर यांच्यावर असेल. हे गोलंदाज कशी कामगिरी करतात? यावर भारताच्या विश्वचषकाचे भवितव्य आहे. गेल्या काही दिवसांत कुलदीप यादव याने दमदार कामगिरी केली आहे. जाडेजानेही आपले योगदान दिलेय. अक्षर पटेल भारतीय खेळपट्टीवर प्रभावी झालाय.. पण फिरकी गोलंदाजीत विविधता दिसत नाही. त्याचा फटका टीम इंडियाला बसतो की नाही? हे दोन महिन्यात स्पष्ट होईलच.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हतेABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Embed widget