India squad for Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी सिलेक्शन कमिटीच टेन्शनमध्ये, 'या' खेळाडूंना संघात घ्यायचं का नाही? गोंधळाची परिस्थिती
यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. आतापर्यंत स्पर्धेसाठी 8 पैकी 6 संघांची घोषणा करण्यात आली आहे.
Team India Champions Trophy 2025 : यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. आतापर्यंत स्पर्धेसाठी 8 पैकी 6 संघांची घोषणा करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या संघांची घोषणा अद्याप झालेली नाही. 18 किंवा 19 जानेवारीपर्यंत टीम इंडियाची घोषणा होऊ शकते. दरम्यान, टीम इंडियाची सिलेक्शन कमिटीच काही खेळाडूंबाबत टेन्शनमध्ये असल्याचे दिसून येऊ शकते.
2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये केएल राहुलच्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेमुळे भारतीय संघाला संतुलन मिळाले होते, परंतु आता असे दिसते की ऋषभ पंतच्या पुनरागमनामुळे केएल राहुल मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ही जबाबदारी स्वीकारणार नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 15 सदस्यीय संघाची निवड 19 जानेवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीत केली जाईल. या बैठकीत दुसरा यष्टीरक्षक आणि कुलदीप यादव यांच्या तंदुरुस्तीवर चर्चा होऊ शकते, कारण जर तो वेळेत तंदुरुस्त झाला नाही. तर त्याच्या जागी दुसऱ्या लेग स्पिनरला संधी मिळू शकते.
ऋषभ पंतला पहिली पसंती... दुसरा यष्टीरक्षक कोण?
यष्टीरक्षक म्हणून या पदासाठी ऋषभ पंतला पहिली पसंती मानली जाते. दुसऱ्या यष्टीरक्षकाच्या स्थानासाठी ध्रुव जुरेल, संजू सॅमसन आणि इशान किशन यांच्यात स्पर्धा होऊ शकते. पण, सध्याची परिस्थिती पाहता जुरेलची निवड होण्याची शक्यता जास्त दिसते. संजू सॅमसनने विजय हजारे ट्रॉफीमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे त्याचा पत्ता कट होऊ शकतो.
इशान किशनने 27 एकदिवसीय सामन्यांमध्ये 933 धावा केल्या आहेत, ज्यात एका द्विशतकाचा समावेश आहे, परंतु देशांतर्गत क्रिकेटमधील अनुपस्थितीमुळे तो संघा बाहेर असू शकतो. जुरेलला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने यष्टीरक्षक आणि फलंदाज अशा दोन्ही भूमिकांमध्ये छाप पाडली आहे, त्यामुळे त्याला संधी मिळू शकते.
कुलदीप यादवची तंदुरुस्ती ही मोठी चिंता
निवड समितीच्या बैठकीत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी लेग स्पिनरच्या भूमिकेबाबतही गंभीर चर्चा होऊ शकते. कुलदीप यादवला लवकरच फिटनेस टेस्ट द्यावी लागेल आणि जर तो तंदुरुस्त नसेल तर केकेआरच्या वरुण चक्रवर्ती किंवा रवी बिश्नोईला संधी मिळू शकते. दोघांनीही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर यांनाही त्यांच्या कौशल्यांची जाणीव आहे, कारण त्यांनी याआधी दोघांसोबत काम केले आहे.
हे ही वाचा -