Rohit Sharma Ranji Trophy : कर्णधार रोहित शर्माने अचानक घेतला मोठा निर्णय; शुभमन गिलला मिळणार मोठी जबाबदारी
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा अद्याप झालेली नाही, पण संघाची धुरा रोहित शर्माकडेच राहील हे निश्चित आहे.
Rohit Sharma to join Mumbai practice session Ranji Trophy : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा अद्याप झालेली नाही, पण संघाची धुरा रोहित शर्माकडेच राहील हे निश्चित आहे. पण रोहितचा फलंदाजीचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो हिटमॅनप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. तीन सामन्यांच्या पाच डावात तो फक्त 31 धावा करू शकला. खराब फॉर्ममुळे संघर्ष करणाऱ्या रोहितने पाचव्या कसोटी सामन्यातून स्वतःला बाहेर काढले होते. त्यावेळी इरफान पठाण आणि रवी शास्त्री सारख्या खेळाडूंनीही त्याच्या संघातील सततच्या उपस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. रोहितने देशांतर्गत क्रिकेट खेळावे यावरही भर देण्यात आला. आता याबाबत एक मोठी अपडेट आली आहे.
रोहित मुंबई रणजी संघासोबत करणार सराव
ऑस्ट्रेलियातील पराभवानंतर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. रोहित देखील या बैठकीचा भाग होता. आता रोहितने मुंबई रणजी संघासोबत सराव करण्यास रस दाखवला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, रोहितने मुख्य प्रशिक्षक ओंकार सलवी यांच्याशी संपर्क साधला आहे आणि पुढील रणजी सामन्यासाठी ते कधी सराव सुरू करणार आहेत याची चौकशी केली, जो अजून 10 दिवसांवर आहे. रोहित मंगळवारी मुंबईत एका प्रमोशनल कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
🚨 ROHIT SHARMA IS BACK. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 13, 2025
- Rohit has informed the Mumbai team that he'll be coming for the Ranji Trophy practice session scheduled tomorrow at Wankhede. (Express Sports). pic.twitter.com/LHkv48Mmtu
मुंबईकडून रोहित शर्मा कधी खेळला शेवटचा सामना?
23 जानेवारी रोजी रणजी ट्रॉफी पुन्हा सुरू झाल्यावर मुंबईचा सामना जम्मू आणि काश्मीरशी होणार आहे आणि बाद फेरीत पोहोचण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. आता रोहित शर्मा फक्त सराव सत्रांमध्ये भाग घेतो की मुंबई संघासोबत रणजी ट्रॉफीमध्येही भाग घेतो हे पाहणे बाकी आहे. तो शेवटचा सामना 2015 मध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध मुंबईकडून खेळला होता.
कसोटी क्रिकेटमध्ये 12 शतके
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी रोहित शर्मा न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्धही फेल ठरला. त्याने 2013 मध्ये भारतीय संघासाठी कसोटी पदार्पण केले. यानंतर, त्याने 67 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 4301 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 12 शतके आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे.
शुभमन गिलला मिळणार मोठी जबाबदारी
युवा क्रिकेटपटू शुभमन गिलबद्दलही मोठी बातमी समोर येत आहे. वृत्तानुसार, शुभमन गिल कर्नाटकविरुद्धचा पुढील रणजी ट्रॉफी सामना खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याला एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्याकडे नेतृत्वाची भूमिका देऊ शकता. याचा अर्थ असा की त्याला एकदिवसीय सामन्यांमध्ये उपकर्णधारपद दिले जाऊ शकते.
हे ही वाचा -
Gautam Gambhir : गौतम गंभीरच्या मनासारखे झाले तर... 'हा' पठ्ठ्या होणार टीम इंडियाचा कर्णधार!