(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India's ODI Squad Announced : राहुलकडे कर्णधारपद; दक्षिण आफ्रिकाविरोधातील एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची निवड
India's ODI Squad Announced : कोसोटी मालिकेनंतर भारत दक्षिण आफ्रिकाविरोधात तीन सामन्याची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. 19 जानेवारी रोजी भारताच्या या अभियानाला सुरुवात होणार आहे.
India's ODI Squad Announced : दक्षिण आफ्रिकाविरोधात होणाऱ्या तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. विराट कोहलीला कर्णधारपदावरुन पायउतार केल्यानंतर रोहित शर्माकडे नेतृत्व देण्यात आलं. पण दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरीच रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे कसोटी मालिकेतून रोहित शर्माने माघारी घेतली होती. रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्यामुळे एकदिवसीय सामन्यासाठी संघाची निवड उशीर झाला. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत के. एल राहुलकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर जसप्रीत बुमराहकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. दुखापतीमुळे रोहित शर्मा आणि रविंद्र जाडेजा दक्षिण आफ्रिाकविरोधातील एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे. त्याजागी के. एल. राहुलकडे कर्णधापद सोपवण्याचा निर्णय निवड समितीने घेतला. मोहम्मद शमीला आराम देण्यात आला आहे. तर शिखर धवनचे पुनरागमन झालं आहे.
कसा आहे भारतीय संघ -
के. एल. राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), यजुवेंद्र चहल, आर. अश्विन, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज
तीन सामन्याच्या कोसोटी मालिकेनंतर भारत दक्षिण आफ्रिकाविरोधात तीन सामन्याची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. 19 जानेवारी रोजी भारताच्या या अभियानाला सुरुवात होणार आहे. भारत तब्बल तीन वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. यापूर्वी, भारतानं 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. तर नव्याने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नेमका दौरा कसा असेल यावर एक नजर फिरवूया...
कसोटी सामने
26 डिसेंबर, 2021 ते 30 डिसेंबर, 2021 सुपरस्पोर्ट पार्क, सेन्चुरियन.... भारताचा 113 धावांनी विजय
3 जानेवारी,2022 ते 7 जानेवीर, 2022 न्यू वांडरर्स मैदान, जोहान्सबर्ग.
11 जानेवारी, 2022 ते 15 जानेवारी, 2022 न्यू लँड्स, केपटाऊन
एकदिवसीय सामने
19 जानेवारी 2022 - बोलंड पार्क, पार्ल - दुपारी दोन वाजता
21 जानेवारी 2022 - बोलंड पार्क, पार्ल - दुपारी दोन वाजता
23 जानेवारी 2022 - न्यू लँड्स क्रिकेट ग्राऊंड, केपटाऊन - दुपारी दोन वाजता
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
संबधित बातम्या :
Team India : 14 सामने, 365 दिवस, 250 पेक्षा जास्त विकेट; कसोटीत भारतीय गोलंदाजांचा दबदबा
कोहली ब्रिगेडने इतिहास रचला, सेंच्युरियनचं मैदान कधीही न गमावणाऱ्या आफ्रिकेला हरवलं!
मोठी बातमी : दुखापतीमुळे रोहित शर्मा दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी संघातून बाहेर, युवा क्रिकेटपटूला मिळाली संधी