IND vs AUS : आर अश्विनने अनिल कुंबळेचा विक्रम मोडताच कुंबळेनं दिली आपली प्रतिक्रिया, वाचा काय आहे ट्वीट?
R Ashwin : अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या डावात 6 विकेट्स घेत भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे याचा एक खास रेकॉर्ड रविचंद्रन अश्विन यानं तोडला.
Ashwin Record : भारतीय फिरकी गोलंदाज आर अश्विन (R Ashwin) याने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खास रेकॉर्ड केला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात भारताकडून अश्विनने सर्वाधिक विकेट घेतल्या. आर अश्विनने 47.2 षटकात 91 धावा देत 6 बळी घेतले. विशेष म्हणजे आर अश्विनने 32व्यांदा एका डावात 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. दरम्यान याआधी भारताकडून एका डावात सर्वाधिक 5 विकेट्स घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर होता. अनिल कुंबळेने 31 डावात 5 विकेट घेतल्या होत्या, मात्र आता रवी अश्विनने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आत्तापर्यंत रवी अश्विनने 32 डावात 5 विकेट घेतल्या आहेत. रवी अश्विनने भारतीय भूमीवर 26 वेळा एका डावात 5 विकेट घेतल्या आहेत. तर अनिल कुंबळेने भारतीय भूमीवर 25 डावात 5 विकेट घेतल्या. या प्रकरणातही रवी अश्विनने अनिल कुंबळेला मागे टाकले आहे. दरम्यान अश्विननं कुंबळेचा रेकॉर्ड मोडल्यावर कुंबळेनं ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली.
अनिल कुंबळेने ट्वीट करत केलं अश्विनचं कौतुक
अनिल कुंबळेने रवी अश्विनच्या शानदार गोलंदाजीबद्दल ट्वीट केलं आहे. अनिल कुंबळेचं हे ट्वीट चांगलेच व्हायरल होत आहे. अनिल कुंबळेने ट्वीट करून आर अश्विनचे कौतुक केले आहे. तसंच अश्विनने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आत्तापर्यंत अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत 113 बळी घेतले आहेत. यापूर्वी हा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर होता. अनिल कुंबळेच्या नावावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात 111 विकेट्स आहेत, पण आता अश्विनने माजी भारतीय दिग्गज खेळाडूला यातही मागे टाकलं आहे. अशाप्रकारे अहमदाबाद कसोटीत रवी अश्विनने अनिल कुंबळेचे दोन मोठे विक्रम मागे टाकले.
पाहा Tweet-
Well Bowled @ashwinravi99 Class ! 👏👍🏽
— Anil Kumble (@anilkumble1074) March 10, 2023
आणखी एक रेकॉर्डही मोडू शकतो
अश्विन लवकरच आपल्या नावावर आणखी एक मोठा विक्रम करू शकतो. तो भारतीय मैदानावर सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज बनू शकतो. सध्या हा विक्रम भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेच्या (Anil Kumble) नावावर आहे. आर अश्विनने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 (BGT 2023) अंतर्गत चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात घेतलेल्या 6 विकेट्समुळे त्याच्या विकेट्सची संख्या 472 वर पोहोचवली असून घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये त्याने घेतलेल्या विकेट्सची संख्या 335 वर गेली आहे. भारतात अनिल कुंबळेने 63 कसोटी सामन्यांच्या 115 डावात 350 विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय मैदानावर तो बऱ्याच काळापासून सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज म्हणून विराजमान आहे. आता अश्विन हा विक्रम मोडण्यापासून फक्त 15 विकेट्स दूर आहे. पुढील 7 ते 8 सामन्यांमध्ये अश्विन हा मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.
हे देखील वाचा-