एक्स्प्लोर

Ind vs Pak Playing XI Asia Cup 2025 : पाकिस्तानविरुद्ध सूर्या आपला हुकमी एक्का बाहेर काढणार; वरुण चक्रवर्तीचा पत्ता कट? जाणून घ्या टीम इंडियाची प्लेइंग-11

India vs Pakistan Asia Cup 2025 : आशिया कप 2025 मधील सहावा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी 14 सप्टेंबर रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.

India playing XI vs Pakistan Asia Cup 2025 : आशिया कप 2025 मधील सहावा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी 14 सप्टेंबर रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. दोन्ही संघांनी आपापला पहिला सामना जिंकला आहे. भारताने यूएईवर दणदणीत विजय मिळवला, तर पाकिस्तानने ओमानला हरवत खाते उघडले. 

पाकिस्तानविरुद्ध सूर्या आपला हुकमी एक्का बाहेर काढणार

हा सामना जिंकणारा संघ थेट सुपर-4 कडे झेप घेईल, तर हरलेला संघ पुढच्या लढतीत सर्वस्व पणाला लावणार आहे. भारताने यूएईविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराह या एकाच वेगवान गोलंदाजाला संधी दिली होती. मात्र पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत अर्शदीप सिंगची पुनरागमनाची शक्यता प्रबळ आहे.

अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती कुणाचा पत्ता कट होणार?

यूएईविरुद्ध सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर यांच्या जोडीने तीन फिरकीपटूंवर विश्वास दाखवला होता, ज्यामध्ये कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती होते. त्यात कुलदीपने अफलातून कामगिरी करत चार विकेट घेतले होते. त्यामुळे त्याला बाहेर बसविण्याचा प्रश्नच नाही. आता अर्शदीपला जागा देण्यासाठी अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांपैकी एक बाहेर जाणार हे निश्चित आहे. अक्षर पटेल खालच्या फळीत फलंदाजीचा चांगला पर्याय ठरतो. त्यामुळे संघ व्यवस्थापन त्याला ठेवण्याकडे झुकलेले दिसते. त्यामुळे वरुण चक्रवर्तीला बाहेर केल्या जाऊ शकते.

जर अक्षरला बाहेर बसवले गेले तर भारताच्या फलंदाजीची खोली कमी होईल आणि वरच्या क्रमावर अधिक दबाव येईल. म्हणूनच पाकिस्तानविरुद्ध अर्शदीपच्या समावेशासाठी वरुणलाच बाजूला व्हावे लागेल, अशी चिन्हे आहेत.

पाकिस्तानविरुद्ध ही असू शकते भारताची प्लेइंग-11 : (India playing XI vs Pakistan Asia Cup 2025)

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल/वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.

भारताचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक)

पाकिस्तान संघ : सलमान आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, हारिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हरीस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम, साहिबजादा फरहान, सैम अय्युब, सलमान मिर्झा, शाहीन शाह आफ्रिदी, सुफन शाह.

हे ही वाचा -

Ind vs Pak Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार? मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी, काही तासाआधी मोठी अपडेट

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार

व्हिडीओ

Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Embed widget