Ind vs SA : पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी, भारताच्या पराभवाची पाच कारणे
Ind vs SA, 1st ODI : पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिका संघाने भारताचा 31 धावांनी पराभव केला. या विजयासह दक्षिण आफ्रिकाने तीन सामन्याच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
South Africa won by 31 runs India Paarl 1st ODI : पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिका संघाने भारताचा 31 धावांनी पराभव केला. या विजयासह दक्षिण आफ्रिकाने तीन सामन्याच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिका संघाने दिलेल्या 297 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 50 षटकांत आठ बाद 265 धावा करता आल्या. शिखर धवनने सर्वाधिक 79 धावांची खेळी केली, पण भारतीय संघला विजय मिळवून देण्यास अपयश आले. जाणून घेऊयात भारतीय संघाच्या पराभवाची कारणे...
मध्यक्रम अपयशी -
कसोटी मालिकेप्रमाणेच एकदिवसीय सामन्यातही भारतीय संघाच्या फलंदाजीचा मध्यक्रम सप्शेल अपयशी ठरलाय. शिखर धवन आणि विराट कोहलीने सामना भारताच्या बाजूने झुकवला होता. पण धवन-कोहली बाद झाल्यानंतर मध्यक्रम फलंदाजांना एकही मोठी भागिदारी करता आली नाही. ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. पंत फक्त 16 धावा काढून बाद झाला. तर पाचव्या क्रमांकावर आलेल्या श्रेयस अय्यरला 17 धावा करता आल्या. वेंकटेश अय्यरही 2 धावा काढून माघारी परतला.
अश्वासक सुरुवात मिळाली नाही -
भारतीय संघाला अश्वासक सुरुवात देण्यास सलामी फलंदाज अपयश ठरले. राहुल स्वस्तात माघारी परतला. राहुलला फक्त 12 धावा करता आल्या. राहुल-धवनची चांगली भागिदारी झाली असती तर चित्र वेगळं पाहायला मिळाले असते.
एकही शतक नाही -
दक्षिण आफ्रिका संघातील फलंदाजांनी संयमी आणि सावध फलंदाजी केली. पडझडीनंतरही बवूमा आणि डुसेन यांनी शतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. पण भारतीय संघाकडून एकाही फलंदाजाला शतक झळकावता आले नाही. शिखर धवनने सर्वाधिक 79 धावा केल्या. तर विराट कोहलीने 51 धावा केल्या. पण या दोन्ही फलंदाजाला अर्धशतकाला शतकांमध्ये रुपांतर करण्यास अपयश आले.
वेंकटेश अय्यरला गोलंदाजी न देणं -
युवा वेंकटेश अय्यरला गोलंदाजी न देणं, हे देखील पराभवाचं कारण आहे. वेंकटेश अय्यरला हार्दिक पांड्याची रिप्लेसमेंट म्हणून खेळवलं गेलं आहे. तर त्याला काही षटकं गोलंदाजी द्यायला हवी होती. मैदान मोठं होतं... वेंकटेश अय्यरचा वेगही कमी होता. वेंकटेश अय्यर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो. शार्दूल ठाकूर, चहल आणि बुमराह यांच्यावरील ताण कमी झाला असता. अतिरिक्त गोलंदाज नेहमीच संघासाठी एक्स फॅक्टर ठरु शकतो.
बवुमा- डुसेनची द्वशतकी भागिदारी -
कर्णधार टेम्बा बवुमा आणि डुसेन यांनी केलेल्या २०४ धावांच्या भागिदारीच्या जोरावर आफ्रिका संघाने २९६ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय गोलंदाजांचा या जोडीने प्रखरपणे सामना केला. संयमी फलंदाजी करत संघाची धावसंख्या वाढवली. दोघांनीही शतकी खेळी केली. भारतीय गोलंदाजांना यांची भागिदारी तोडण्यास अपयश आले.