(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SA, Centurion Test : ऐतिहासिक कसोटी जिंकूनही टीम इंडियाला भरावा लागला भुर्दंड
IND vs SA, Centurion Test : बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवूनही भारतीय संघाला भुर्दंड भरावा लागणार आहे.
IND vs SA, Centurion Test : सेंच्युरियन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने 113 धावाने विजय साजरा केला. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवूनही भारतीय संघाला भुर्दंड भरावा लागणार आहे. दक्षिण आफ्रिाकविरोधाच झालेल्या कसोटी सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीने भारतीय संघाला दंड ठोठावला आहे. तसेच WTC चा एक गुणही कमी झाला आहे. सेंच्युरियनवर आतापर्यंत कोणत्याही आशियाई संघाला करता न आलेला कारनामा विराट अँड कंपनीने करुन दाखवलं. आता तीन जानेवारीपासून होणाऱ्या दुसऱ्या कसोटीची तयारी भारतीय संघाने केली आहे.
स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीने भारतीय संघाला सामन्याच्या 20 टक्के मानधन कपातीचा दंड ठोठावला आहे. त्यासोबतच विश्व टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतील एक गुणही कमी करण्यात आला आहे. आईसीसीचे मॅच रेफरी एँड्रयू पायक्रॉफ्ट यांनी भारतीय संघाला दंड ठोठावला आहे. कारण, भारतीय संघाने निर्धारित वेळेमध्ये एक षटक कमी टाकल्याचं त्यांच्या निदर्शनास आले. आयसीसी आचरसिंता नियम 2.22 नुसार भारतीय खेळाडूना सामन्याच्या मानधनातील 20 टक्के रक्कम कपातीचा दंड ठोठावण्यात आलाय.
त्याशिवाय आयसीसी विश्व टेस्ट चॅम्पियनशिपच्या 16.11.2 नियमांनुसार, भारतीय संघाचा एक गुण कपात करण्यात आला आहे. 16.11.2 नियमांनुसार प्रत्येक षटकाला एक गुण कमी केला जातो. त्यामुळे या सामन्यानंतर WTC च्या गुणतालिकेतील भारतीय संघाचा एक गुण कपात करण्यात आला आहे. आतापर्यंत भारतीय संघाचे तीन गुण कपात करण्यात आले आहेत.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
तीन सामन्याच्या कोसोटी मालिकेनंतर भारत दक्षिण आफ्रिकाविरोधात तीन सामन्याची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. 19 जानेवारी रोजी भारताच्या या अभियानाला सुरुवात होणार आहे. भारत तब्बल तीन वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. यापूर्वी, भारतानं 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. तर नव्याने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नेमका दौरा कसा असेल यावर एक नजर फिरवूया...
कसोटी सामने
26 डिसेंबर, 2021 ते 30 डिसेंबर, 2021 सुपरस्पोर्ट पार्क, सेन्चुरियन.... भारताचा 113 धावांनी विजय
3 जानेवारी,2022 ते 7 जानेवीर, 2022 न्यू वांडरर्स मैदान, जोहान्सबर्ग.
11 जानेवारी, 2022 ते 15 जानेवारी, 2022 न्यू लँड्स, केपटाऊन
एकदिवसीय सामने
19 जानेवारी 2022 - बोलंड पार्क, पार्ल - दुपारी दोन वाजता
21 जानेवारी 2022 - बोलंड पार्क, पार्ल - दुपारी दोन वाजता
23 जानेवारी 2022 - न्यू लँड्स क्रिकेट ग्राऊंड, केपटाऊन - दुपारी दोन वाजता
संबधित बातम्या :
- India's ODI Squad Announced : राहुलकडे कर्णधारपद; दक्षिण आफ्रिकाविरोधातील एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची निवड
- U19 Asia Cup 2021 Final: सरत्या वर्षाचा शेवट गोड! भारतानं आठव्यांदा अंडर-19 आशिया चषकावर कोरलं नाव
- Chetan Sharma on Kohli : विराट कोहलीला टी20 कर्णधारपद सोडायला सांगितलं नव्हतं, बीसीसीआयचं स्पष्टीकरण