(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND VS ZIM: केएल राहुलच्या नेतृत्वात टीम इंडियाची कामगिरी कशी? पाहा आकडेवारी
KL Rahul Captaincy Stats : भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर असून या दौऱ्यात दोन्ही संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.
KL Rahul Captaincy Stats : भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर असून या दौऱ्यात दोन्ही संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. 18 ऑगस्टपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. केएल राहुलने दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन केलेय. झिम्बाब्वेविरोधात राहुल भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. याआधीही राहुलने भारतीय संघाचं नेतृत्व केलेय. राहुलने याआधी एका कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाची धुरा सांभाळली आहे. पण अद्याप राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघाचा विजय झालेला नाही. राहुल कर्णधार म्हणून पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे.
पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत राहुल-
केएल राहुल (KL Rahul) दुखापतीनंतर मैदानावर परतणार आहे. कर्णधार म्हणून आतापर्यंत राहुलला लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. राहुलने आतापर्यंत एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यात टीम इडियाचं नेतृत्व केलेय. या तिन्ही सामन्यात भारताचा पराभव झालाय. अशात झिम्बाब्वे विरोधात कर्णधार म्हणून राहुल पहिल्या विजयासाठी प्रयत्न करेल. झिम्बाब्वेविरोधात मालिका जिंकून राहुल कर्णधारपदाचे आकडे चांगले करण्याचा प्रयत्न करेल.
शिखरच्या जागी राहुलकडे नेतृत्व -
झिम्बाब्वेविरोधात राहुलकडे भारतीय संघाची धुरा आहे. पण, झिम्बाब्वेविरोधात संघाची घोषणा झाली तेव्हा शिखर धवनला कर्णधारपद देण्यात आले होते. पण राहुल तंदुरुस्त झाल्यानंतर त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
झिम्बाब्वे विरुद्ध भारतीय संघ भारतीय संघ:
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर शाहबाज अहमद.
झिम्बाब्वे दौऱ्यातील भारतीय संघाचं वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 18 ऑगस्ट 2022 | हरारे स्पोर्ट्स क्लब |
दुसरा एकदिवसीय सामना | 20 ऑगस्ट 2022 | हरारे स्पोर्ट्स क्लब |
तिसरा एकदिवसीय सामना | 22 ऑगस्ट 2022 | हरारे स्पोर्ट्स क्लब |
केएल राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघाची कामगिरी
केएल राहुलनं या वर्षी जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच भारतीय संघाचं जबाबदारी खाद्यावर घेतली होती. या एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. या दौऱ्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत केएल राहुलनं भारतीय कसोट संघाचं नेतृत्व केलं होतं. या सामन्यातही भारताला सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. फेब्रुवारी महिन्यापासून भारतानं कोणताही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला नाही.
हे देखील वाचा-