Rohit Sharma: नेटकऱ्यांच्या नजरेतून काहीच सुटत नाही; स्वातंत्र्यदिनी रोहित शर्माच्या हातून घडली चूक, झाला ट्रोल!
भारतानं 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरा केला. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्यानं देशभरातील कानाकोपऱ्यात तिरंगा फडकवण्यात आला.
Indian Independence Day 2022: भारतानं 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरा केला. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्यानं देशभरातील कानाकोपऱ्यात तिरंगा फडकवण्यात आला. या दिवशी देशातील प्रत्येकानं आपल्या देशवासियांना सोशल मीडियाच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. याचदरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) सोशल मीडियाच्या माध्यमातून देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. परंतु, त्याच्या एका चुकीमुळं नेटकऱ्यांनी त्याला खूप ट्रोल केलंय. रोहित शर्मानं शेअर केलेल्या तिरंग्याचा फोटो फोटोशॉप एडिट असल्यानं नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय.
रोहित शर्मानं स्वातंत्र्यदिनी शेअर केलेल्या ट्विटर पोस्टमध्ये तो भारताच्या पारंपारिक पोशाखात दिसत आहे. त्यानं कुर्त्यासोबत नेहरू जॅकेट घातलेला दिसत आहे. तसेच चेहऱ्यावर मोठे हास्स देत अभिमानानं तिरंगा फडकत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये रोहित शर्मानं लिहलंय की, "स्वातंत्र्याची 75वी जयंती, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!". परंतु, रोहित शर्माच्या फोटोला निरखून पाहिल्यास कळेल की, त्याच्या हातात खरा तिरंगा नसून फोटोशॉपमध्ये एडिट केलेला फोटो आहे. ज्यामुळं नेटकऱ्यांनी रोहित शर्माला ट्रोल करायला सुरुवात केलीय.
सोशल मीडियावर रोहित शर्मा ट्रोल
रोहित शर्माच्या फोटोचा उल्लेख करत नेटकऱ्यांनी हॅप्पी फोटोशॉप कॅप्टन असा टोला लगावलाय. तर, काही जण म्हणतात की, रोहित शर्माकडं लाखो रुपये आहेत. परंतु, आपल्या देशाचा ध्वज खरेदी करू शकला नाही. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याला तिरंग्याचा फोटो फोटोशॉपमध्ये एडिट करावा लागतोय.
ट्वीट-
ट्वीट-
ट्वीट-
75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त संपूर्ण देशभरात आनंदाचं वातावरण
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा विशेष पर्व स्वातंत्र्याचा अमृतोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. सर्वत्र जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळालं. तसेच देशाचा कानाकोपरा तिरंग्यानं व्यापला गेला. स्वातंत्र्याच्या या सोहळ्यात भारतीय क्रिकेट संघाचे अनेक सदस्यांनी सहभाग दर्शवत चाहत्यांचे अभिनंदनही केलं. रोहित शर्मानं हल्लीच आंतरराष्ट्रीय टी-20 मधला जागतिक विक्रम मोडला होता. त्यानं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 हजार 487 धावा करत न्यूझीलंड संघाचा फलंदाज मार्टिन गप्टिलचा जागतिक विक्रम मोडीत काढला आहे.
हे देखील वाचा-