IND vs SL, 1st Test, : जाडेजाची अष्टपैलू कामगिरी, भारताचा मोठा विजय, श्रीलंकेला एक डाव 222 धावांनी दिली मात
IND vs SL, 1st Test, Mohali: भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या कसोटी सामन्यात एका मोठ्या विजयाची नोंद केली आहे. या विजयात रवींद्र जाडेजाचा सिंहाचा वाटा आहे.
IND vs SL, : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात मोहालीत येथे पहिला कसोटी सामना पार पडला. सामन्याच्या पहिल्या दिवशीपासून भारताचं पारडं जड दिसत असल्यानं अखेर भारतानचं एक डाव आणि 222 धावांनी एका मोठ्या विजयाची नोंद केली आहे. यावेळी भारताकडून रवींद्र जाडेजा याने अष्टपैलू कामगिरी केली. एका डावात नाबाद 175 धावांसह दोन डावांत एकूण 9 विकेट्स त्याने घेतल्या आहेत.
सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकत भारताने फलंदाजाची निर्णय घेतला. पहिल्या दिवशी भारतीय संघाने 85 षटकांत 6 बाद 357 धावा केल्या. पहिल्या दिवशी ऋषभ पंतने 97 चेंडूमध्ये 96 धावा केल्या. तर हनुमा विहारीने 128 चेंडूत 58 धावा केल्या. तर कोहली 45 धावा करुन तंबूत परतला. दुसऱ्या दिवशी जाडेजाने उत्तम सुरुवात केली त्याला आश्विनची साथ मिळाली. आश्विन 61 धावा करुन बाद झाला तर जाडेजा 175 धावांवर नाबाद राहिला. अखेर 574 धावांवर भारताने डाव घोषित केला. ज्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजांनी पहिल्या दिवस अखेर 108 धावा करत 4 विकेट गमावल्या. ज्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास 6 विकेट्स भारताने मिळवल्या. ज्यानंतर श्रीलंकेला फॉलोऑन मिळाल्याने श्रीलंकेने दुसरा डाव सुरु केला. ज्यात एन. डिकवेला (नाबाद 51) याच्याशिवाय एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता न आल्याने 178 धावांवर श्रीलंका पुन्हा सर्वबाद झाली. ज्यामुळे भारताने एक डाव आणि 222 धावांनी सामना जिंकत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे.
जाडेजाने मोडला कपिल देव यांचा विक्रम
या सामन्यात रवींद्र जाडेजाच्या नावावर एक नवा विक्रम झाला आहे. त्याने जाडेजाने भारताचे माजी खेळाडू कपिल देव यांचा विक्रम मोडला आहे. रवींद्र जाडेजा हा सातव्या क्रमांकावर खेळायला आला होता. यापूर्वी सातव्या क्रमांकावर खेळायला येऊन सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा कपिल देव यांच्या नावावर होता. कपिल देव यांनी सातव्या क्रमांकावर खेळायला येऊन 170 धावांची खेळी केली होती. पण जाडेजाने 175 धावंची दमदार खेळी करत कपिल देव यांचा विक्रम मोडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- IND vs SL, 1st Test: रविंद्र जडेजानं रचला इतिहास, कपिल देवचा 'हा' विक्रम मोडला
- Virat Kohli Test Runs : शंभराव्या कसोटीत 8000 धावा पूर्ण करणारा विराट कोहली दुसरा फलंदाज
- 'अनुष्का ग्राऊंडवर काय करतेय?' विराट कोहलीच्या 100व्या कसोटी सामन्या दरम्यान नेटकऱ्यांकडून ट्रोल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha