एक्स्प्लोर

IND vs SL : मोहाली कसोटीत रिषभ पंतच्या नावावर खास रेकॉर्ड, रोहित शर्माला मागे टाकलं

श्रीलंकेविरुद्धच्या मोहाली कसोटीत रिषभ पंतने 97 चेंडूंचा सामना करत 96 धावा केल्या. या दरम्यान त्याने 9 चौकार आणि चार षटकार लगावले. या षटकारांच्या मदतीने एक खास रेकॉर्ड त्याने आपल्या नावावर केला आहे.

IND vs SL : मोहाली : भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना मोहालीमध्ये खेळवला जात आहे. या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. भारताने पहिल्या डाव 574 धावांवर घोषित केला. टीम इंडियाच्या या डावात रविंद्र जाडेजा आणि रिषभ पंत यांचं मोलाचं योगदान होतं. जाडेजा 175 धावांवर नाबाद राहिला तर पंतने 96 धावांची खेळली रचली. रिषभ पंतने या खेळीदरम्यान एक खास विक्रम आपल्या नावावर केला.

मोहालीमध्ये रिषभ पंतने 97 चेंडूंचा सामना करत 96 धावा केल्या. या दरम्यान त्याने 9 चौकार आणि चार षटकार लगावले. या षटकारांच्या मदतीने एक खास रेकॉर्ड बनवण्यात पंत यशस्वी ठरला. क्रिकेटमध्ये ऑगस्ट 2018 पासून सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या बाबतीत रिषभ पंत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. याबाबतीत त्याने रोहित शर्मालाही मागे टाकलं.

कसोटी क्रिकेटमध्ये ऑगस्ट 2018 नंतर आतापर्यंत सर्वाधिक षटकार लगावणाऱ्यांच्या यादीत बेन स्टोक्स पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने 43 षटकार लगावले आहेत. तर रिषभ पंत 42 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत तिसऱ्या स्थानावर रोहित शर्मा आहे. रोहितने 34 षटकार ठोकले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर रिषभ पंतचा हा खास विक्रम आहे.

यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने ऑगस्ट 2018 मध्ये इंग्लंडविरोधात पदार्पण केलं होतं. त्यानंतर आतापर्यंत त्याने 29 कसोटी सामन्यांमध्ये खेळला आहे. या सामन्यातील 49 डावात त्याने 1831 धावा केल्या. त्याच्या नावावर 4 शतकं आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे. तो अनेक वेळा नर्व्हस नाईन्टीचा बळी ठरला आहे.

भारत मजबूत स्थितीत
मोहाली कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. या दिवशी भारताने दमदार कामगिरी केली आहे. रविंद्र जाडेजच्या पावणे दोनशे धावांच्या खेळीच्या बळावर भारताने लंकेसमोर धावांचा डोंगर उभा केला आहे. 8 विकेट्सच्या मोबदल्यात भारताने लंकेसमोर 574 धावांचं आव्हान उभं केलं आहे. कर्णधार रोहित शर्माने 574 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला आहे. त्यामुळे आता भारत मजबूत स्थितीत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकत भारताने फलंदाजाची निर्णय घेतला. पहिल्या दिवशी भारतीय संघाने 85 षटकांत 6 बाद 357 धावा केल्या. पहिल्या दिवशी रिषभ पंतने 97 चेंडूमध्ये 96 धावा केल्या. तर हनुमा विहारीने 128 चेंडूत 58 धावा केल्या. विराट कोहलीचा हा शंभरावा कसोटी सामना आहे. मात्र कोहली 45 धावा करुन तंबूत परतला होता.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
Sachin Tendulkar on Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची एलिमिनेटर मॅचमध्ये वादळी खेळी, क्रिकेटच्या देवालाही बोलायला भाग पाडलं, सचिन तेंडुलकर म्हणाला...
15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची एलिमिनेटर मॅचमध्ये वादळी खेळी, क्रिकेटच्या देवालाही बोलायला भाग पाडलं, सचिन तेंडुलकर म्हणाला...
SRH vs RR Eliminator IPL 2026 : 29 चेंडूत वैभव सूर्यवंशीचा महाप्रलय! एलिमिनेटरमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर हैदराबाद बाहेर, राजस्थानचे 'रॉयल्स' आता क्वालिफायर-2मध्ये
29 चेंडूत वैभव सूर्यवंशीचा महाप्रलय! एलिमिनेटरमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर हैदराबाद बाहेर, राजस्थानचे 'रॉयल्स' आता क्वालिफायर-2मध्ये
SRH vs RR Eliminator IPL 2026 : वैभव सुर्यवंशीच्या वादळी 97 धावा; हैदराबादचा धुव्वा उडवत राजस्थान क्वालिफायर-2 मध्ये
SRH vs RR Eliminator Update : वैभव सुर्यवंशीच्या वादळी 97 धावा; हैदराबादचा धुव्वा उडवत राजस्थान क्वालिफायर-2 मध्ये

व्हिडीओ

Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड
Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Iran War Live Update: अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
Riteish Deshmukh on Raja Shivaji: रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
Bashir Badr: उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
Chhatrapati Sambhajinagar : अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
Embed widget