एक्स्प्लोर

Virat Kohli Century : शतक नंबर 73! नववर्षाच्या सुरुवातीला शतक ठोकत कोहलीनं नवा रेकॉर्डही केला नावावर

IND vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली याने 113 धावांची दमदार खेळी करत लागोपाठ दुसरं एकदिवसीय शतक ठोकलं आहे.

Virat Kohli 73rd Century : भारत आणि श्रीलंका यांच्यातील (IND vs SL) पहिल्या वनडे सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) शानदार शतक झळकावले. त्याने 91 चेंडूत 113 धावांची दमदार खेळी केली. त्याच्या खेळीत 11 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. या शतकासह त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 73 वे शतक पूर्ण केले आहे. याआधी त्याने बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यातही शतक झळकावले होते. ज्यामुळे त्याने सलग दोन सामन्यात शतक झळकावत अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Team India (@indiancricketteam)

हे विक्रमही केले नावावर

एकदिवसीय क्रिकेटमध्ये 12, 500 धावांचा टप्पा पार करणारा कोहली हा दुसरा फलंदाज ठरला आहे. याशिवाय त्याने वनडे कारकिर्दीतील 45 वे शतक त्याने झळकावले. त्याचवेळी घरच्या मैदानावर त्याचे हे 20 वे आंतरराष्ट्रीय शतक होते. या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. एकदिवसीय कारकिर्दीत सर्वाधिक शतके झळकावणारा कोहली हा दुसरा फलंदाज आहे. त्याच्यासाठी 2023 वर्षाची सुरुवात चांगली झाली असून वर्षातील पहिल्याच सामन्यात त्याने शतक झळकावल्याने आता वर्षभरात आणखी शतकं ठोकेल अशी आशा आहे. 

रोहित शर्माही दिसला दमदार लयीत

या सामन्यात विराट कोहलीशिवाय रोहित शर्माने भारताकडून शानदार खेळी केली. त्याने 67 चेंडूत 83 धावा केल्या. त्याच्या खेळीत एकूण 9 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. रोहितने संघाला चांगली सुरुवात करून दिली. सलामीची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्याच्यासोबत आलेला शुभमन गिलही 70 धावांची इनिंग खेळून माघारी परतला.

10 तारीख कोहलीसाठी ठरली लकी

आज 10 तारखेला कोहलीने त्याचे 45 वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. यापूर्वी बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यातही त्याने कारकिर्दीतील 44 वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. तो सामना 10 डिसेंबर 2022 रोजी खेळला गेला होता आणि आजचा सामनाही 10 जानेवारीलाही खेळवला जात आहे.

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित

व्हिडीओ

ZP Election Result : जिल्हा परिषद निवडणुकीत मराठवाड्यात कुणाचा गुलाल, कोण बेहाल? Special Report
Pashchim Maharashtra Elecction : पश्चिम महाराष्ट्रात झेपीचा कारभारी कोण? Special Report
ZP konkan Result : जिल्हा परिषदेत सिंधुदुर्ग राणेंचो, रत्नागिरी सामंतांची Special Report
Political Family Result : घराणेशाहीचा कुठे जय, कुठे पराजय? Special Report
Pashchim Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रात झेपीचा कारभारी कोण? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
ZP Eelction results: झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
Embed widget