एक्स्प्लोर

IND vs SL, 1st ODI : शुभमन-रोहितची दमदार सुरुवात, कोहलीचं धडाकेबाज शतक, भारतानं उभारला 373 धावांचा डोंगर

IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 373 धावा स्कोरबोर्डवर लावल्या असून आता श्रीलंकेचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.

IND vs SL, 1st ODI : गुवाहाटी येथे सुरु भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या वनडेमध्ये (IND vs SL ODI) भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 374 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ज्यामुळे दासून शनाकाच्या श्रीलंका संघाला पहिली वनडे जिंकण्यासाठी 374 धावा कराव्या लागतील. भारताकडून विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. त्याने 87 चेंडूत 113 धावा केल्या त्याने केलेल्या या खेळीत 12 चौकार आणि 1 षटकार ठोकला आहे. विराट कोहलीच्या वनडे कारकिर्दीतील हे 45 वे शतक असून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे 73 वे शतक आहे.

विराट कोहलीशिवाय रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनीही उत्कृष्ट खेळी खेळली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 143 धावांची भागीदारी केली. भारतीय कर्णधाराने 67 चेंडूत 83 धावा केल्या तर शुभमन गिलने 60 चेंडूत 70 धावांचे योगदान दिले.

श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्या फ्लॉप

रोहित शर्माने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचवेळी शुभमन गिलने आपल्या खेळीत 11 चौकार लगावले. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने 29 चेंडूत 39 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. मात्र, याशिवाय श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्यासारख्या फलंदाजांनी निराशा केली. श्रेयस अय्यरने 24 चेंडूत 28 धावा केल्या. तर हार्दिक पांड्याने 12 चेंडूत 14 धावा केल्या.

श्रीलंकेच्या गोलंदाजांची अवस्था बिकट

श्रीलंकेच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर, कासून रजिथा हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. कसून राजिताने 10 षटकांत 88 धावांत 3 खेळाडू बाद केले. याशिवाय दिलशान मधुशंका, दाशून शनाका, धनंजय डी सिल्वा आणि चमिका करुणारत्ने यांना 1-1 असे यश मिळाले. तर वनिंदू हसरंगा आणि दुनिथ वेळगे यांना एकही यश मिळाले नाही.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

सामन्यात सर्वात आधी श्रीलंकेचा कर्णधार दाशून शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 143 धावांची भागीदारी केली. विशेष म्हणजे, दोन्ही संघांमधील 3 वनडे मालिकेतील पहिला सामना गुवाहाटी येथे खेळला जात आहे. 3 वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेण्यासाठी श्रीलंकेला 50 षटकात 374 धावा करायच्या आहेत.

हे देखील वाचा-

R Ashwin on Jadeja Comeback: आर अश्विनने सांगितलं जाडेजा कधी करणार भारतीय संघात पुनरागमन? म्हणाला...

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Devendra Fadnavis Majha Vision Full : शिंदे - दादांच्या बंडाची कहाणी! फडणवीसांनी सगळंच सांगितलं!Chanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचा वेगवान आढावा : 14 April 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 04 PM : 14 May  2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : मुस्लिम धार्जिणी पार्टी म्हणजे उ.बा.ठा, फडणवीसांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
Kartiki Gaikwad Pregnancy News :  'लिटिल चॅम्प'च्या घरी इवलुशा पावलांनी आला पाहुणा; कार्तिकी-रोनित झाले आई-बाबा
'लिटिल चॅम्प'च्या घरी इवलुशा पावलांनी आला पाहुणा; कार्तिकी-रोनित झाले आई-बाबा
Marathi Serial Update Zee Marathi Bharat Jadhav : भरत जाधवचे टीव्ही मालिकेत कमबॅक,  'या' मालिकेत साकारणार खलनायकी भूमिका
भरत जाधवचे टीव्ही मालिकेत कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार खलनायकी भूमिका
शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
संजिव गोयंका अन् राहुलमध्ये काय चर्चा झाली, लखनौच्या प्रशिक्षकाचा मोठा खुलासा
संजिव गोयंका अन् राहुलमध्ये काय चर्चा झाली, लखनौच्या प्रशिक्षकाचा मोठा खुलासा
Embed widget