IND Vs SA, Coronavirus | प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येणार भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेतील सामने
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळवण्यात येणारा पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. पावसामुळे सामन्याचा नाणेफेक न करताच रद्द करण्यात आला.
IND Vs SA : कोरोना व्हायरसमुळे भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळवण्यात येणाऱ्या मालिकेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेत 15 मार्च रोजी लखनऊमध्ये होणारा दुसरा आणि 18 मार्च रोजी कोलकत्तामध्ये होणारा तिसरा एकदिवसीय सामना प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येणार आहे. कोरोनामुळे हा निर्णय घेण्यात आला असून आयोजकांनी विकण्यात आलेल्या तिकीटांचे पैसेही प्रेक्षकांना परत करण्याचा विचार केला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 15 मार्च रोजी होणारा तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना लखनभ येथे खेळवण्यात येणार आहे. आता हा सामना प्रेक्षकांशिवाय रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. आतापर्यंत या सामन्याचे 5 कोटी रूपयांचे तिकीट विकण्यात आले आहेत. पण आता हे तिकीटांचे पैसे प्रेक्षकांना परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मालिकेतील शेवटचा सामना 18 मार्च रोजी कोलकत्ता येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्याच्या विकण्यात आलेल्या सर्व तिकिटांचे पैसे प्रेक्षकांना परत करण्यात येणार आहेत. याआधी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पार पडलेला मालिकेतील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे टॉस न करताच रद्द करण्यात आला.
आयपीएलवरही कोरोनाचं सावट
कोरोना व्हायरसमुळे 29 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या नव्या सीझनवरही कोरोनाटचं सावट आहे. क्रिडा मंत्रालयाने बीसीसीआयला सांगितलं आहे की, आयपीएलचं आयोजनही प्रेक्षकांशिवाय करावं. दरम्यान, बीसीसीआयने आतापर्यंत आयपीएलच्या आयोजनाबाबत कोणताच निर्णय घेतला नाही. 14 मार्चला होणाऱ्या आयपीएल गर्वनिंग काऊंसिलच्या मीटिंगनंतर सर्व गोष्टी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळवण्यात येणारा पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. पावसामुळे सामन्याचा नाणेफेक न करताच रद्द करण्यात आला. दोन्ही संघांमधील मालिकेतील दुसरा सामना 15 मार्च रोजी लखनऊमध्ये खेळवण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :
Women T20 World Cup | फायनल पाहण्यासाठी कोरोनाग्रस्त रुग्ण स्टेडियममध्ये, MCG ची माहिती
T20 World Cup | ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा उंचावला विश्वचषक; भारतीय महिला संघाचा 85 धावांनी पराभव IND vs SA, Coronavirus | चेंडूला चमकवण्यासाठी खेळाडूंनी कमीत कमी थुंकीचा वापर करावा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय coronavirus | आयपीएल सामन्यांच्या तिकीटविक्रीवर बंदी घालण्याचा सरकारचा विचार