एक्स्प्लोर

T20 World Cup | ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा उंचावला विश्वचषक; भारतीय महिला संघाचा 85 धावांनी पराभव

ऑस्ट्रेलियाने भारताला नमवत पाचव्यांदा विश्वचषक उंचावला आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 185 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा खेळ अवघ्या 99 धावांमध्ये आटोपला.

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने भारताला हरवून ट्वेन्टी20 विश्वचषकावर पुन्हा एकदा नाव कोरलंय. ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलिसा हिली आणि बेथ मूनी यांची शतकी भागीदारी आणि गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा विश्वचषक उंचावलाय. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना अक्षरश: ठोकून काढले. ऑस्ट्रेलियानं भारताला 20 षटकांत 185 धावांचं आव्हान दिलं. त्यानंतर भारताला अवघ्या 99 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय हिलीने आपल्या आक्रमक फलंदाजीने योग्य असल्याचे दाखवून दिले. हिलीने यावेळी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. आतापर्यंत झालेल्या पुरुषांच्या आणि महिलांच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. हिलीने 39 चेंडूंत सात चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 75 धावा केल्या. हिली बाद झाल्यावर बेथ मुनीनेही आक्रमक फलंदाजी केली आणि त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला भारतासमोर धावांचा डोंगर उभारता आला.
डोमेस्टिक क्रिकेटचा 'सचिन' वसिम जाफरची निवृत्तीची घोषणा या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी अतिशय खराब कामगिरी केली. भारताकडून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी सलामीवीर शफाली वर्मा ही अंतिम सामन्यात अयशस्वी ठरली. सामन्याच्या तिसऱ्याच चेंडूवर ती दोन धावा काढून बाद झाली. त्यानंतर दुखापतग्रस्त तानिया भाटीयाच्या जागी मैदानावर आलेली जेमायमा रॉड्रीग्ज शून्यावर माघारी परतली. आधीच्या षटकात दोन चौकार लगावलेली स्मृती मानधना 11 धावा करून बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौर 4 धावांवर माघारी परतली. दिप्ती शर्माने झुंज देत सर्वाधिक 33 धावा केल्या. पण इतर फलंदाजांनी साफ निराशा केली. भारताचे तब्बल 6 फलंदाज एक आकडी धावसंख्येवर बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शूटने सर्वाधिक 4 बळी टिपले. Thief At Saloni Alot Home | सलोनी अलोटची घरात घुसलेल्या चोरट्यावर झडप

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Retirement: रोहित शर्माच नव्हे, टीम इंडियाचे 'हे' 6 दिग्गजही घेऊ शकतात निवृत्ती; कधीही होऊ शकते मोठी घोषणा
रोहित शर्माच नव्हे, टीम इंडियाचे 'हे' 6 दिग्गजही घेऊ शकतात निवृत्ती; कधीही होऊ शकते मोठी घोषणा
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Rohit Sharma Retirement: 'रोहित, विराटची गरज नाही, असं भासवण्यासाठी प्रयत्न सुरूयेत?'; आर. अश्विननं गंभीर-अगरकरांना सुनावलं
'रोहित, विराटची गरज नाही, असं भासवण्यासाठी प्रयत्न सुरूयेत?'; आर. अश्विननं गंभीर-अगरकरांना सुनावलं
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk: काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
Ketan Agrawal Case: केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
Buldhana Crime: संतापजनक! नवऱ्याचा डोळ्यादेखत 19 वर्षीय विवाहितेसोबत नको ते कृत्य; शस्त्राचा धाक दाखवून दोन नराधमांनी मोबाईल अन् पैसेही हिसकावले, बुलढाणा जिल्हा हादरला!
संतापजनक! नवऱ्याचा डोळ्यादेखत 19 वर्षीय विवाहितेसोबत नको ते कृत्य; शस्त्राचा धाक दाखवून दोन नराधमांनी मोबाईल अन् पैसेही हिसकावले, बुलढाणा जिल्हा हादरला!
महेश मांजरेकरांनी सोडलेल्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' साठी रणदीप हुड्डांना National Award! ओटीटीवर कुठे पहाल?
महेश मांजरेकरांनी सोडलेल्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' साठी रणदीप हुड्डांना National Award! ओटीटीवर कुठे पहाल?
CBSE 10th Board Result 2026: प्रतीक्षा संपली! CBSE इयत्ता 10 वीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर, झटपट निकाल पाहण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
प्रतीक्षा संपली! CBSE इयत्ता 10 वीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर, झटपट निकाल पाहण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
Aaditya Thackeray: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आम्ही हाच अन्याय...'
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आम्ही हाच अन्याय...'
Donald Trump: 'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
Pune Crime Ravindra Dhangekar: खलील शेख मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट, रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल, पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना
खलील शेख मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट, रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल, पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना
Embed widget