IND vs PAK : तिसऱ्या बॉलवर सिक्सर, रोहित शर्माने दंड थोपटले, शाहीन आफ्रिदीला अस्मान दाखवलं, पाहा Video
IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी20 वर्ल्ड कपमधील मॅचमध्ये बाबर आझमनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
न्यूयॉर्क : टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मॅच सुरु आहे. पाकचा कॅप्टन बाबर आझमनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीला उतरण्याचा निर्णय घेतला. पावसामुळं उशिरानं सुरु झालेल्या मॅचमध्ये भारतीय संघ पहिल्यांदा फलंदाजीला उतरला. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीनं (Virat Kohli) भारताच्या डावाची सुरुवात केली. एका ओव्हरचा खेळ झाल्यावर पाऊस सुरु झाल्यानं मॅच थांबवावी लागली. मात्र, रोहित शर्मानं पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केले. शाहीन आफ्रिदीला रोहित शर्मानं खणखणीत षटकार लगावला.
पाहा व्हिडीओ रोहित शर्माचा षटकार
📽️ ROHIT SHARMA FREAK PICK UP SHOT AGAINST SHAHEEN AFRIDI pic.twitter.com/hToRIksgOv
— KKR Vibe (@KnightsVibe) June 9, 2024
भारताचा संघ
भारताचा संघ : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शिवम दूबे, रिषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा,मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग
पाकिस्तान: मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), बाबर आझम (कॅप्टन), उस्मान खान, फखर जमान, इमाद वसीम, इफ्तिखार अहमद, शादाब खान, शाहीन शाह अफ्रिदी, हारिस रऊफ ,मोहम्मद आमिर, नसीम शाह,
पावसामुळं मॅचमध्ये व्यत्यय
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचकडे चाहत्यांचं लक्ष लागलेल असतं. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमधील संबंध ताणलेले असल्यानं फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये दोन्ही संघ आमने सामने येतात. भारत आणि पाकिस्तानच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, पावसामुळं मॅचला उशीर झाला. बाबर आझमनं टॉस जिंकल्यानंतर भारतीय संघ फलंदाजीला मैदानावर आला. रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं डावाची सुरुवात केली. शाहीन आफ्रिदीच्या एका ओव्हरमध्ये रोहित शर्मानं 8 धावा काढल्या. रोहित शर्मानं तिसऱ्याच बॉलवर शाहीन आफ्रिदीला अस्मान दाखवलं. या ओव्हरनंतर पुन्हा एकदा पावसानं सुरुवात केल्यानं मॅच थांबवण्यात आली.
भारताची सलामीची जोडी मैदानावर
रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं भारताच्या डावाची सुरुवात केली. आयरलँड विरुद्धच्या मॅचमध्ये देखील विराट कोहली आणि रोहित शर्मानं डावाची सुरुवात केली होती. भारतीय संघात आजच्या मॅचमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.
संबंधित बातम्या :
IND vs PAK : भारत पाकिस्तान लढतीला पावसानं उशीर, बाबरनं टॉस जिंकला, रोहित शर्माची विशेष रणनीती...