IND vs NZ: रांचीमध्ये होणाऱ्या सामन्यात स्टेडियममध्ये प्रेक्षकांना एन्ट्री, नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड भारतात येणार
India vs New Zealand: न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात 17 नोव्हेंबरला पहिल्या T20 सामन्याने होणार आहे.
New Zealand tour of India 2021: कोरोना प्रकरणांमध्ये घट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर झारखंड सरकारने शुक्रवारी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. रांची येथील JSCA आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 19 नोव्हेंबर रोजी होणार्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील T20 सामन्यात 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. T20 विश्वचषकानंतर किवी संघ तीन सामन्यांची T20 मालिका आणि दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 17 नोव्हेंबरला पहिल्या टी-20 सामन्याने होणार आहे.
भारताचा न्यूझीलंड दौरा
न्यूझीलंड संघाला भारत दौऱ्यावर तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना 17 नोव्हेंबरला जयपूरमध्ये खेळवला जाणार आहे. त्याचवेळी दुसरा टी-20 सामना रांचीमध्ये 19 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. या सामन्यात स्टेडियममध्ये प्रेक्षकांची एन्ट्री होणार आहे. राज्य सरकारने 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी दिली आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना 21 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. यानंतर पहिली कसोटी कानपूरमध्ये तर दुसरी कसोटी मुंबईत खेळवली जाईल.
रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेट बोर्ड या मालिकेसाठी टीम इंडियाच्या काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊ शकते. केएल राहुल किंवा श्रेयस अय्यर या दोघांना टी-20 मालिकेत टीम इंडियाचे कर्णधारपद मिळू शकते.
संपूर्ण वेळापत्रक येथे जाणून घ्या
T20 मालिका
पहिला T20 - 17 नोव्हेंबर (जयपूर)
दुसरी T20 - 19 नोव्हेंबर (रांची)
तिसरा T20 - 21 नोव्हेंबर (कोलकाता)
टेस्ट मालिका
पहिली कसोटी 28-29 नोव्हेंबर (कानपूर)
दुसरी कसोटी- 03-07 डिसेंबर (मुंबई)