Ind vs Nz 3rd Test : गंभीर-रोहित 'या' खेळाडूवर खेळणार शेवटचा डाव; मुंबईत फेल ठरला तर कारकीर्दीला लागणार ब्रेक
Ind vs Nz 3rd Test : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सलग दोन सामने गमावल्यानंतर टीम इंडिया बॅकफूटवर आहे.
India vs New Zealand Test Series : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सलग दोन सामने गमावल्यानंतर टीम इंडिया बॅकफूटवर आहे. 12 वर्षांनंतर प्रथमच मायदेशात कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय संघात मोठा बदल होऊ शकतो. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरी कसोटी गुरुवार 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. टीम इंडियाने ही मालिका गमावली आहे, पण आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी धोक्यात आली आहे.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या भारत-न्यूझीलंड तिसऱ्या कसोटीत टीम इंडिया आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल करू शकते. दुसऱ्या कसोटीत अनुभवी फलंदाज केएल राहुलसह 3 खेळाडूंना वगळण्यात आले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पुन्हा एकदा यापैकी एका खेळाडूवर विश्वास दाखवू शकतात.
केएल राहुलला पुन्हा मिळणार संधी?
पुण्यात झालेल्या दुसऱ्या कसोटीत केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. शुभमन गिल तंदुरुस्त परतल्यावर टीम इंडिया व्यवस्थापनाने त्याला संधी दिली आणि सर्फराज खानवरही विश्वास व्यक्त केला. मात्र, 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी केएल राहुलला टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे. याचा अर्थ तो प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडला असला तरी गंभीर आणि रोहितचा त्याच्यावर विश्वास आहे.
राहुल मुंबई कसोटीत खेळणार?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा केएल राहुलला संधी देऊ शकतात. मात्र, प्लेइंग इलेव्हनमधून कोणता खेळाडू बाहेर होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सर्फराज खानने बंगळुरू कसोटीत शानदार शतक झळकावले होते, त्यामुळे त्याला हटवणे सोपे जाणार नाही. केएल राहुलला संधी मिळाल्यास शुभमन गिलला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते.
न्यूझीलंडला मोठा धक्का
मुंबईत होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज केन विल्यमसनही तिसऱ्या सामन्यातून बाहेर आहे. न्यूझीलंड क्रिकेटने मंगळवारी जाहीर केले की केन विल्यमसन मुंबईत खेळल्या जाणाऱ्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत खेळणार नाही. न्यूझीलंड संघाने ही मालिका जिंकली असून त्यांना 28 नोव्हेंबरपासून इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. हे लक्षात घेऊन खबरदारी म्हणून बोर्डाने केन विल्यमसनला पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची संधी दिली आहे.
हे ही वाचा -
Kane Williamson : संघाला मोठा धक्का; IND vs NZ तिसऱ्या सामन्यातून स्टार खेळाडू बाहेर
IND vs NZ 3rd Test Pitch : टीम इंडिया आपल्याच जाळ्यात फसणार? मुंबईत खेळपट्टीबाबत आखला मोठा प्लॅन