एक्स्प्लोर

IND vs NZ 2nd ODI Live Streaming : न्यूझीलंडविरुद्ध रंगणार दुसरी वन-डे, कधी, कुठे पाहाल सामना?

IND vs NZ : श्रीलंका संघाला तीन पैकी तीन सामन्यात मात दिल्यावर आता भारत न्यूझीलंडविरुद्ध मालिकाविजयासाठीही सज्ज झाला आहे. कारण आजचा सामना जिंकल्यास भारत मालिकाही नावावर करु शकतो.

IND vs NZ 2nd ODI Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) न्यूझीलंड संघाविरुद्ध भारतीय भूमीत एकदिवसीय मालिका (IND vs NZ ODI Series) खेळत आहे. आज मालिकेतील दुसरा सामना रंगणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) हा दुसरा एकदिवसीय सामना रायपूरमध्ये रंगणार आहे. दरम्यान मालिकेतील पहिला सामना भारताने 12 धावांच्या फरकाने जिंकला. तब्बल 350 धावांचे लक्ष्य भारताने यावेळी दिले. शुभमनने 208 धावा रचत द्विशतक केलं. पण न्यूझीलंडच्या ब्रेसवेलने 140 धावा करत कडवी झुंज दिली, मात्र अखेर भारतच जिंकला. ज्यानंतर आजचा सामना भारत जिंकल्यास मालिका भारताच्या नावे होईल, तर न्यूझीलंड सामना जिंकल्यास मालिका 1-1 अशी बरोबरीत येईल. तर आजच्या या सामन्याची माहिती जाणून घेऊ...

कधी होणार सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड हा दुसरा एकदिवसीय (India vs New Zealand 2nd ODI) आज अर्थात 21 जानेवारी रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामना खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. 

कुठे आहे सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.  

कुठे पाहता येणार सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

भारताचा एकदिवसीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार) वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराद, उमरान मलिक 

न्यूझीलंडचा एकदिवसीय संघ:

फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकिपर/कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन, हेन्री शिपले

भारत विरुद्ध न्यूझीलंड Head to Head

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 114 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 56 सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने 50 सामने जिंकले आहेत. याशिवाय 7 सामन्यांमध्ये कोणताही निकाल लागला नाही आणि एक सामना बरोबरीत सुटला.  

हे देखील वाचा-

 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weather Update : सावध रहा! आज तापमान 47 अंशांवर पोहोचू शकते; 'या' राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
हवामान अपडेट: सावध रहा! आज तापमान 47 अंशांवर पोहोचू शकते; 'या' राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
Pune Khed Gas Cylinder Blast : गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
Mumbai Local Train: मुंबईत लोकल ट्रेनचा मेगाब्लॉक, फास्ट ट्रेन स्लो ट्रॅकला वळवणार, हार्बर लाईनच्या वेळापत्रकातही महत्त्वाचे बदल
मुंबईत लोकल ट्रेनचा मेगाब्लॉक, फास्ट ट्रेन स्लो ट्रॅकला वळवणार, हार्बर लाईनच्या वेळापत्रकातही महत्त्वाचे बदल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी,आध्यात्मिक अनुभव :19 मे 2024TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 19 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Update : सावध रहा! आज तापमान 47 अंशांवर पोहोचू शकते; 'या' राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
हवामान अपडेट: सावध रहा! आज तापमान 47 अंशांवर पोहोचू शकते; 'या' राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
Pune Khed Gas Cylinder Blast : गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
Mumbai Local Train: मुंबईत लोकल ट्रेनचा मेगाब्लॉक, फास्ट ट्रेन स्लो ट्रॅकला वळवणार, हार्बर लाईनच्या वेळापत्रकातही महत्त्वाचे बदल
मुंबईत लोकल ट्रेनचा मेगाब्लॉक, फास्ट ट्रेन स्लो ट्रॅकला वळवणार, हार्बर लाईनच्या वेळापत्रकातही महत्त्वाचे बदल
Bollywood Actor : पोट भरण्यासाठी चित्रपटांत मार खायचा 'हा' सुपरस्टार, तिन्ही खानला करायचंय सोबत काम; ओळखलं का?
पोट भरण्यासाठी चित्रपटांत मार खायचा 'हा' सुपरस्टार, तिन्ही खानला करायचंय सोबत काम; ओळखलं का?
Mohini Ekadashi 2024 : आज मोहिनी एकादशीला जुळून आले दुर्मिळ योग; 'या' राशींची होणार लखलखाट, नोकरी-व्यवसायासह सर्वत्र मिळणार लाभ
आज मोहिनी एकादशीला बनतायत दुर्मिळ योग; 'या' राशींसाठी ठरणार फलदायी, नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Embed widget