एक्स्प्लोर

Kavya Maran : दक्षिण आफ्रिका टी20 लीगदरम्यान पठ्ठ्यानं केलं थेट काव्या मारनलाच प्रपोज, व्हायरल झाला VIDEO

Viral Video : सनरायजर्स हैदराबाद संघाची सीईओ काव्या मारनचे फोटो कायमच व्हायरल होतात, ती इंटरनेट सेन्सेशन असून आता तर एका दक्षिण आफ्रिकेतील प्रेक्षकानं तिला सामन्यादरम्यान प्रपोज केला आहे.

Kavya Maran Propose :  सनरायझर्स संघाची सीईओ काव्या मारन (Kavya Maran) ही कायम कोणत्या न कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. कधी आयपीएळ लिलावात तर कधी सनरायझर्स हैदराबादचे (SRH) सामने सुरु असताना तिचे क्युट फोटो-व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. दक्षिण आफ्रिका टी20 लीगमध्येही काव्याचा संघ सनरायझर्स ईस्टर्न केप हा सहभागी असून संघाच्या सामन्यादरम्यान एका फॅनने बोर्डवर लिहित चक्क काव्याला लग्नाची मागणी घातली आहे. 

सामना सुरु असताना संबंधित प्रेक्षकाने एका कार्डबोर्डवर काव्या मारन तू माझ्याशी लग्न करशील का? असं लिहिलं होतं. तो बोर्ड घेऊन बसला होता. कॅमेरामननं देखील हा बोर्ड पाहिला आणि त्या प्रेक्षकाचं शूटिंग केलं. ज्यामुळे सर्वांनीच या पठ्ठ्याला पाहिलं. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसंच अनेक भारतीय मजेशीर कमेंट्स यावर करत आहेत.

पाहा व्हायरल होणार VIDEO

कायमच काव्या होत असते VIRAL

काव्या मारन ही कायम व्हायरल होताना दिसते. सप्टेंबर 2022 मध्ये दक्षिण आफ्रिका टी20 क्रिकेट लीगसाठी (T20 Cricket League) खेळाडूंचा लिलाव सुरु असताना केपटाऊन इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा लिलाव पार पडला. केपटाऊनमध्ये होणाऱ्या या लिलावात 318 खेळाडूंसाठी बोली लावली गेली. दरम्यान या बोलीदरम्यान, सनरायझर्स संघाची सीईओ काव्या मारन ही देखील उपस्थित होती. काव्याचे आयपीएल लिलाव तसंच सामन्यादरम्यानचे फोटो व्हायरल झाले होते तसेच तिचे दक्षिण आफ्रिकेच्या लिलावादरम्यानचे काव्याचे फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ज्यानंतर आता डिसेंबर, 2022 मध्ये आयपीएल लिलावावेळीही ती उपस्थित होती, तेव्हाती तिचे लूक्स व्हायरल झाले होते.

कोण आहे काव्या मारन?

काव्या मारन ही सनरायझर्स फ्रँचायझीची सीईओ आहे. ती प्रसिद्ध उद्योगपती कलानिधी मारन यांची मुलगी असून कलानिधी मारन हे प्रसिद्ध सन ग्रुपचे संस्थापक आहेत. कलानिधी हे विविध दूरचित्रवाणी वाहिन्या, एफएम रेडिओ स्टेशन, डीटीएच सेवा, वर्तमानपत्रे आणि एका फिल्म प्रोडक्शन हाऊसचेही मालक आहेत. काव्या मारन हिला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट असल्याने ती आयपीएल दरम्यान सनरायझर्स हैदराबादच्या जवळपास सर्व सामन्यांमध्ये स्टेडियममध्ये उपस्थित असते. आपल्या संघाला प्रोत्साहन देखील देताना ती दिसून येते. काव्या मारनचे सामन्यादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने ती एक सोशल मीडिया सेन्सेशनही झाली आहे.

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CSK vs SRH IPL 2026 : कमिन्स-इशानने चेन्नईचा गेम वाजवला; CSK पराभूत अन् 2 संघांना मिळालं प्लेऑफचं तिकीट, ‘सुपर किंग्स’ आता देवाच्या भरवशावर
कमिन्स-इशानने चेन्नईचा गेम वाजवला; CSK पराभूत अन् 2 संघांना मिळालं प्लेऑफचं तिकीट, ‘सुपर किंग्स’ आता देवाच्या भरवशावर
CSK vs SRH Live Update IPL 2026 : चेन्नईचा गड राखण्यात ऋतुराज अपयशी, पॅट कमिन्सच्या पलटवारने हाय-व्होल्टेज सामन्यात घातला धुमाकूळ, CSKला 5 गड्यांनी चारली धूळ
CSK vs SRH Live Update : चेन्नईचा गड राखण्यात ऋतुराज अपयशी, पॅट कमिन्सच्या पलटवारने हाय-व्होल्टेज सामन्यात घातला धुमाकूळ, CSKला 5 गड्यांनी चारली धूळ
Ind Vs Afg Squad ODI Series : रोहित शर्मा OUT अन् विराट कोहली IN? अफगाणिस्तानविरुद्ध ODI मालिकेपूर्वी होणार मोठा गेम, BCCI बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष
रोहित शर्मा OUT अन् विराट कोहली IN? अफगाणिस्तानविरुद्ध ODI मालिकेपूर्वी होणार मोठा गेम, BCCI बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष
Mike Smith Dies : IPLच्या धामधुमीत काळीज पिळवटणारी बातमी! इंग्लंडच्या माजी कर्णधाराच्या निधनाने क्रिकेटविश्व सुन्न, भारताशी खास नातं
IPLच्या धामधुमीत काळीज पिळवटणारी बातमी! इंग्लंडच्या माजी कर्णधाराच्या निधनाने क्रिकेटविश्व सुन्न, भारताशी खास नातं

व्हिडीओ

Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा
Donald Trump Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांचं खटक्यावर बोट? पुन्हा युद्ध भडकणार?
Sunetra Pawar Letter Special Report : वहिनींची सही, पार्थची शाई, दादांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय?
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meta Layoffs : मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET Paper Leak : मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
Embed widget