एक्स्प्लोर

IND vs NZ : नशीबच फुटकं! रोहित शर्मा अशाप्रकारे आऊट झाला की विश्वासच बसेना, व्हिडीओ पाहून तुम्हीही डोकं धराल

रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या बंगळुरू कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले.

IND vs NZ 1st Test Rohit Sharma unlucky : रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या बंगळुरू कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले. रोहितने टीम इंडियासाठी दमदार कामगिरी करत 52 धावा केल्या. मात्र, एका चुकीमुळे रोहितने त्याची विकेट गमावली. तो चांगल्या लयीत होता. न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना एजाज पटेलने विकेट घेतली.

टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात रोहित आणि यशस्वी जैस्वाल सलामीला आले. यादरम्यान रोहितने 63 चेंडूंचा सामना करत 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. दरम्यान, एजाज खानने न्यूझीलंडसाठी डावातील 22 वे षटक करण्यासाठी आला. ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर त्याने रोहितची विकेट घेतली. खरंतर, रोहितने या चेंडूचा चांगला बचाव केला होता. पण चेंडू मागे जाऊन स्टंपला लागला. अशात रोहितची विकेट गेली. रोहित 52 धावा करून बाद झाला.

दुसऱ्या डावात भारताची चांगली कामगिरी -

पहिल्या डावात अवघ्या 46 धावा करून टीम इंडिया ऑलआऊट झाली होती. पण भारताने दुसऱ्या डावात चांगली कामगिरी केली आहे. वृत्त लिहेपर्यंत टीम इंडियाने 2 गडी गमावून 215 धावा केल्या होत्या. विराट कोहली 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 62 धावा करून खेळत होता. सरफराज खान 62 धावा करून खेळत होता. त्याने 3 षटकार आणि 5 चौकार मारले. तत्पूर्वी, यशस्वी जैस्वाल 35 धावा करून बाद झाली. त्याने 6 चौकार मारले होते.

न्यूझीलंडसाठी रचिन रवींद्रचे शतक -

न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्वबाद 402 धावा केल्या होत्या. यादरम्यान रचिनने शतक झळकावले होते. त्याने 157 चेंडूंचा सामना करत 134 धावा केल्या. यादरम्यान 13 चौकार आणि 4 षटकार मारले. डेव्हन कॉनवेने 91 धावांची दमदार खेळी केली.

हे ही वाचा -

PAK vs ENG 2nd Test : 'पनवती' बाबर आझम! 1348 दिवसांची प्रतीक्षा संपली, पाकिस्तानने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा उडवला धुव्वा

रचिन रवींद्रने बंगळुरूमध्ये घातला धुमाकूळ, ज्या खेळपट्टीवर भारताने 46 धावांवर गुडघे टेकले, त्या खेळपट्टीवर शतक ठोकले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसोझासह अनेकांवर गुन्हा दाखल; हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद
बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसोझासह अनेकांवर गुन्हा दाखल; हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद
अजित पवारंची थेट ॲक्शन; आमदाराचं 6 वर्षासाठी निलंबन; प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेकडून कारवाई
अजित पवारंची थेट ॲक्शन; आमदाराचं 6 वर्षासाठी निलंबन; प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेकडून कारवाई
मविआतील नाना पटोले-संजय राऊत वादावर उद्धव ठाकरेंची रिॲक्शन; शरद पवारांचाही दिल्लीला फोन
मविआतील नाना पटोले-संजय राऊत वादावर उद्धव ठाकरेंची रिॲक्शन; शरद पवारांचाही दिल्लीला फोन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut : मविआतल्या घडामोडींचे राऊतांकडून अपडेटMVA Allegation : बोगस पद्धतीने मतदार यादीतून नावं वगळली जात असल्याचा मविआचा आरोपRajan Teli:  कोण आहेत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणारे राजन तेली ?1 Min 1 Constituency : चर्चेचे झोंबरे वारे; मतभेदाचे निखारे ? : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसोझासह अनेकांवर गुन्हा दाखल; हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद
बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसोझासह अनेकांवर गुन्हा दाखल; हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद
अजित पवारंची थेट ॲक्शन; आमदाराचं 6 वर्षासाठी निलंबन; प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेकडून कारवाई
अजित पवारंची थेट ॲक्शन; आमदाराचं 6 वर्षासाठी निलंबन; प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेकडून कारवाई
मविआतील नाना पटोले-संजय राऊत वादावर उद्धव ठाकरेंची रिॲक्शन; शरद पवारांचाही दिल्लीला फोन
मविआतील नाना पटोले-संजय राऊत वादावर उद्धव ठाकरेंची रिॲक्शन; शरद पवारांचाही दिल्लीला फोन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Nawaz Sharif on India : जयशंकर पाकिस्तानमध्ये पोहोचताच माजी पंतप्रधानांची भाषाच बदलली! नवाज शरीफ म्हणाले तरी काय?
जयशंकर पाकिस्तानमध्ये पोहोचताच माजी पंतप्रधानांची भाषाच बदलली! नवाज शरीफ म्हणाले तरी काय?
संगोल्यात गद्दाराच्या छाताडावर पाय रोवून मशाल विजयी होणार; दीपक साळुंखेंचा प्रवेश अन् ठाकरेंकडून उमेदवारीचे संकेत
संगोल्यात गद्दाराच्या छाताडावर पाय रोवून मशाल विजयी होणार; दीपक साळुंखेंचा प्रवेश अन् ठाकरेंकडून उमेदवारीचे संकेत
Child Marriage Act : जीवनसाथी निवडण्याचा सर्वाना अधिकार, बालविवाह बंदी कायदा 'पर्सनल लॉ'मधील प्रथांमुळे थांबवू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
जीवनसाथी निवडण्याचा सर्वाना अधिकार, बालविवाह बंदी कायदा 'पर्सनल लॉ'मधील प्रथांमुळे थांबवू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Embed widget