PAK vs ENG 2nd Test : 'पनवती' बाबर आझम! 1348 दिवसांची प्रतीक्षा संपली, पाकिस्तानने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा उडवला धुव्वा
घरच्या भूमीवर कसोटी सामना जिंकण्याची त्याची 1338 दिवसांची प्रदीर्घ प्रतीक्षाही अखेर पाकिस्तान संघाची संपली आहे.
Pakistan vs England 2nd Test : घरच्या भूमीवर कसोटी सामना जिंकण्याची त्याची 1338 दिवसांची प्रदीर्घ प्रतीक्षाही अखेर पाकिस्तान संघाची संपली आहे. ज्या सामन्यात बाबर आझम बाहेर होता, त्या सामन्यात पाकिस्तानने 152 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. मुलतान येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानने अवघ्या 4 दिवसांत इंग्लंडचा पराभव केला.
Pakistan spinners rattle England's pursuit of 297.#WTC25 | #PAKvENG 📝: https://t.co/UQ21K8IlDc pic.twitter.com/vd46KwLCpm
— ICC (@ICC) October 17, 2024
मुलतान येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडसमोर विजयासाठी 297 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी मुलतानच्या खेळपट्टीवर पाकिस्तानच्या फिरकीपटूंसमोर शरणागती पत्करली. एकट्या नोमान अलीने इंग्लंडच्या 8 फलंदाजाची शिकार केली. याचा परिणाम असा झाला की संपूर्ण संघ मिळून 150 धावाही करू शकला नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात केवळ 144 धावाच करू शकला आणि सामना गमावला.
Winning moments 📸
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 18, 2024
Pakistan beat England by 1️⃣5️⃣2️⃣ runs 🏏#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/AxAQX89cse
मुलतान कसोटीत पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली. बाबर आझमच्या जागी आलेल्या कामरान गुलामच्या शतकाच्या जोरावर त्याने पहिल्या डावात 366 धावा केल्या. कामरान गुलामने 118 धावांची खेळी केली. यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 291 धावा केल्या. पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात सलमान आघाने 63 धावा केल्या. पाकिस्तानचा दुसरा डाव 221 धावांवर संपला. अशाप्रकारे इंग्लंडला 297 धावांचे लक्ष्य मिळाले.
इंग्लंड सहजच 297 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करेल, असे वाटत होते, परंतु नोमान अली आणि साजिद खान यांनी मिळून दोन्ही डावात इंग्लिश फलंदाजांचा पाणी पाजले. पहिल्या डावात साजिद खानने 7 आणि नोमान अलीने 3 बळी घेतले, तर दुसऱ्या डावात नोमान अलीने 8 तर साजिदने 2 बळी घेतले. म्हणजेच 20 पैकी नोमान अलीने 11 तर साजिद खानने 9 विकेट घेतल्या.
मुलतान येथे खेळली गेलेली पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली होती. दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानने इंग्लंडचा पराभव केला. यासह 3 कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. मुलतानमध्ये खेळली गेलेली दुसरी कसोटी जिंकून पाकिस्तानने 1348 दिवस घरच्या भूमीवर कसोटी सामना न जिंकण्याची प्रतीक्षाही संपवली. त्याने फेब्रुवारी 2021 मध्ये घरच्या भूमीवर शेवटची कसोटी जिंकली होती.
हे ही वाचा -