एक्स्प्लोर

Ind vs IRE- 1st Innings Highlights : हुडाचं शतक, तर संजूचं अर्धशतक, आयर्लंडसमोर 226 धावांचे आव्हान

IND vs IRE, 1st Innings Highlights: हुडा आणि सॅमसन यांच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर भारताने 225 धावा स्कोरबोर्डवर लावत आयर्लंडसमोर 226 धावांचे आव्हान ठेवले आहे. 

IND vs IRE, 2nd T20, Malahide Cricket Club Ground: भारत विरुद्ध आयर्लंड(India vs Ireland) सामन्याक भारताने अत्यंत तुफान फटकेबाजी करत एक बलाढ्य धावसंख्या उभारली आहे. त्यामुळे आता आयर्लंडला विजयासाठी 226 धावांची गरज आहे. सामन्यात भारताचे दोन्ही युवा खेळाडू दीपक हुडा आणि संजू सॅमसन (Sanju Samson and Deepak Hooda) यांनी अत्यंत तुफान फटकेबाजी करत एक भारतासाठी टी20 क्रिकेटमधील सर्वात मोठी भागिदारी उभारली. दोघांनी 176 धावांची भागिदारी केल्यामुळे भारताने इतकी मोठी धावसंख्या उभारली आहे.

सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी सलामीवीप ईशान अवघ्या तीन धावांवर बाद झाला. पण त्यानंतर मात्र दीपक हुडा आणि संजू सॅमसन या जोडीने अगदी धमाकेदार फलंदाजी करत चौफेर फटकेबाजी केली. यावेळी दीपकने अधिक आक्रमकपणे फलंदाजी केली तर संजूने त्याला साथ दिली. संजूने  42 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. पण या दोघांशिवाय इतर खेळाडू मात्र खास कामगिरी करु शकले नाहीत. विशेष म्हणजे भारताने तीन खेळाडू शून्यावर बाद झाले. कार्तिक, अक्षर आणि हर्षल शून्यावर बाद झाले. आयर्लंडकडून मार्कने 3 तर जोशूवा आणि क्रेगने प्रत्येकी 2 विकेट्स घेतले.

हुडा-सॅमसन जोडीचा विक्रम

दीपक हुडा आणि संजू सॅमसन यांनी सामन्यात 176 धावांची भागीदारी उभारत एक मोठा विक्रम केला. त्यांनी भारतासाठी टी20 क्रिकेटमधील सर्वात मोठी भागिदारी केली आहे. दोघांनी 176 धावांची भागिदारी करत याआधीची रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची 165 धावांच्या भागिदारीचा रेकॉर्ड मोडला आहे. विशेष म्हणजे सामन्यात दीपकने आपलं पहिलं वहिलं आंतरराष्ट्रीय टी20 शतक ठोकलं, तर संजूने पहिलं आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठोकलं आहे.

हे देखील वाचा - 

IND vs IRE, 2nd T20, Toss Update : हार्दिकची टोळी बॅटिंगसाठी सज्ज; नाणेफेक जिंकत निवडली फलंदाजी

Ind vs Eng, 5th Test : 'सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा', इंग्लंड दौऱ्यावरील खेळाडूंना बीसीसीआयच्या सूचना

India tour of England : कसोटी सामन्यांसह टी20 आणि वन डेचाही थरार, सामन्यांची वेळ, प्रक्षेपणाच्या चॅनेलसह सर्व माहिती एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget