Varun Chakravarthy : गंभीरचा 'तो' एक निर्णय अन् स्टार खेळाडूच्या आयुष्याला मिळाला टर्निंग पॉईंट! कोहली अन् रोहितने पठ्ठ्याचे जवळपास संपवले होते करिअर
भारताने पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडला 7 गड्यांनी नमवीत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
Varun Chakravarthy Ind vs Eng T20 : ज्या खेळपट्टीवर इंग्लंडचा संपूर्ण संघ 132 धावांत ऑलआऊट झाला, त्याच खेळपट्टीवर एकट्या अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) 34 चेंडूंत 79 धावांचा तडाखा दिला. ज्यामुळे भारताने पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडला 7 गड्यांनी नमवीत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती होता. वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या मोठ्या स्टार खेळाडूंने नांग्या टाकल्या. पण गेल्या काही वर्ष वरुण चक्रवर्तीसाठी खूप कठीण होते. विराट कोहली आणि रोहित शर्मा कर्णधार असताना त्याच्याकडे सतत दुर्लक्षित केले जात होते. पण मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरमुळे तो संघात परतला आणि त्याला संधीचा फायदा घेता आला.
Timber strikes ✅
— BCCI (@BCCI) January 22, 2025
A double-wicket over ✅
Varun Chakaravarthy picks up two! 👏 👏
Follow The Match ▶️ https://t.co/4jwTIC5zzs#TeamIndia | #INDvENG | @chakaravarthy29 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/1TTAWJuvJy
गंभीरच्या एका निर्णयाने वरुण चक्रवर्तीचे बदलले आयुष्य!
वरुण चक्रवर्तीने जुलै 2021 मध्ये टीम इंडियासाठी टी-20 मध्ये पदार्पण केले. पण त्याच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत तो काही खास कामगिरी करू शकला नाही. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या पहिल्या 6 सामन्यांमध्ये फक्त 2 विकेट्स घेतल्या. यानंतर, 2021मध्ये वरुण चक्रवर्तीला कोणत्याही कारणाशिवाय भारतीय संघातून वगळण्यात आले. तो टीम इंडियाच्या प्लानमध्ये अजिबात नव्हता. पण गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होताच त्यांनी वरुण चक्रवर्तीला पुन्हा टी-20 संघात स्थान दिले. वरुण चक्रवर्तीने संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि आता तो एकामागून एक दमदार कामगिरी करत आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेतून वरुण चक्रवर्ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला. सर्वात जास्त अंतरानंतर टी-20 सामना खेळणारा वरुण चक्रवर्ती दुसरा भारतीय खेळाडू ठरला. या तीन वर्षांत त्याने 86 टी-20 सामने खेळले नाहीत. पण त्याचे पुनरागमन खूपच दमदार होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतल्यापासून त्याने 8 सामने खेळले आहेत आणि 11.70 च्या सरासरीने 20 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलच्या गेल्या हंगामात गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मार्गदर्शक होता. वरुण चक्रवर्ती देखील या संघाचा एक भाग होता. त्याने वरुण चक्रवर्तीला खूप जवळून पाहिले होते आणि त्याच्यावर विश्वास दाखवला होता. गंभीरचा तो निर्णय चक्रवर्तीने योग्य असल्याचे सिद्ध केले.
इंग्लंडविरुद्ध सामनावीराचा पुरस्कार जिंकला
इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात वरुण चक्रवर्तीने 4 षटकात 5.75 च्या इकॉनॉमीने फक्त 23 धावा दिल्या आणि 3 विकेट घेतल्या. त्याने जोस बटलर, हॅरी ब्रूक आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या दमदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले.
हे ही वाचा -