Yuzvendra Chahal : भारताच्या 'या' वाघावर जणू आभाळंच कोसळलं, घटस्फोटाच्या चर्चेनंतर आता टीम इंडियातूनही फाईल बंद; करिअर उद्धवस्त?
भारताचा दिग्गज लेग स्पिनर युजवेंद्र चहल बऱ्याच काळापासून टीम इंडियाबाहेर आहे.
Yuzvendra Chahal : भारताचा दिग्गज लेग स्पिनर युजवेंद्र चहल बऱ्याच काळापासून टीम इंडियाबाहेर आहे. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपदरम्यान तो संघाचा सदस्य होता, पण तेव्हापासून तो पुनरागमन करू शकला नाही. त्याची टी-20 संघात किंवा एकदिवसीय संघात निवड होत नाहीये. आता त्याची का निवड होत नाही यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघात लेग-स्पिनर युजवेंद्र चहलची निवड न करण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.
चहलची कारकीर्द संपली?
युजवेंद्र चहल सध्या त्याची पत्नी धनश्री वर्मा सोबतच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण, दोघांनीही अद्याप यावर कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. चहलने नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफी 2024/25 मध्येही भाग घेतला नव्हता. दरम्यान, आकाश चोप्राला म्हणाला की, बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाने कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय चहलची कारकीर्द संपवली आहे.
Karun Nair, Mohammed Siraj, Sanju Samson - should they have been picked for the Champions Trophy?
— Aakash Chopra (@cricketaakash) January 20, 2025
Let's take a look at the ones that missed out on selection in today's #Aakashvani 👇https://t.co/HxMZhDeuyA pic.twitter.com/A5XGT7Wzvm
आकाश चोप्राने बीसीसीआयवर केले गंभीर आरोप
यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा युजवेंद्र चहलच्या कामगिरीवर बोलला. चोप्रा म्हणाले, "युजवेंद्र चहल पूर्णपणे संघातून बाहेर गेला आहे. त्याने शेवटचा सामना जानेवारी 2023 मध्ये खेळला होता. म्हणजे त्याला दोन वर्षे झाले. त्याचे आकडेही खूप चांगले आहेत. त्याने खूप विकेट्स घेतल्या आहेत आणि तो सातत्याने चांगली कामगिरी करत होता. पण आता त्याची फाईल बंद करण्यात आली आहे. त्यामुळे युझीसाठी येथेही जागा नाही. भारताने चार फिरकी गोलंदाज निवडले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे पर्याय होते, परंतु चहल कधीच शर्यतीत नव्हता.
आतापर्यंतची चहलची कारकीर्द
युजवेंद्र चहलने भारतासाठी फक्त 72 एकदिवसीय सामन्यांमध्ये 121 विकेट्स घेतल्या आहेत, परंतु ऑगस्ट 2023 पासून तो भारताकडून कोणत्याही स्वरूपात खेळलेला नाही. लेग-स्पिनर विजय हजारे ट्रॉफी 2024/25 ला खेळू शकला नाही आणि चोप्रा म्हणाले की दोन वर्षे न खेळल्यामुळे त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संघासाठी कधीही दावेदार मानले गेले नाही.
हे ही वाचा -