IND Vs ENG | टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकणं 'या' कारणासाठी अत्यंत आवश्यक
World Test Championship: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेला आज सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाकडे सर्वांचे लक्ष आहे. या मालिकेत मोठा विजय मिळवणं अनेक कारणांसाठी महत्वाचं आहे. यातील एक महत्वाचं कारण म्हणजे जागतिक कसोटी विश्चचषक.
नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेला आज सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाकडे सर्वांचे लक्ष आहे. या मालिकेत मोठा विजय मिळवणं अनेक कारणांसाठी महत्वाचं आहे. यातील एक महत्वाचं कारण म्हणजे जागतिक कसोटी विश्चचषक. टीम इंडियाला जूनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी विश्चचषक (विश्व टेस्ट चॅम्पियनशिप) (डब्ल्यूटीसी) च्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या आगामी मालिकेत कमीत कमी दोन कसोटी जिंकणं आवश्यक आहे. इंग्लंड विरोधात जर भारतानं 1-0 नं विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियासाठी फायनलला जाण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळं घरच्या मैदानावर इंग्लंडला 2-0 नं हरवणं आता टीम इंडियाला अत्यावश्यक झालं आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून दक्षिण आफ्रीका दौरा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर न्यूझीलंड डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये पोहोचला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ट्वीट करत या संबंधित महत्वाची माहिती दिली आहे.
भारतीय संघाला जर फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर इंग्लंडविरोधात चार कसोटी सामन्यांमध्ये कमीत कमी 2-0 नं विजय आवश्यक आहे. 2-1, 3-0, 3-1 अथवा 4-0 नं मिळवलेला विजय अधिक सुरक्षित असेल. जर इंग्लंडची टीम 3-0, 3-1, 4-0 नं मालिका जिंकली तर त्यांना विश्व टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची संधी मिळेल.
भारत जर केवळ 1-0 नं जिंकला किंवा इंग्लंड जर 1-0, 2-0 किंवा 2-1 अशा फरकानं जिंकला तर ऑस्ट्रेलियाचा संघ फायनलमध्ये पोहोचेल. किंवा जर ही मालिका 0-0, 1-1 अथवा 2-2 नं बरोबरीवर सुटली तरीही ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडसोबत फायनलची संधी मिळणार आहे. त्यामुळं टीम इंडिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांसाठी ही कसोटी मालिका अतिशय महत्वाची मानली जात आहे.
पहिला कसोटी सामना आजपासून
- पहिला सामना: 5 फेब्रवारी ते 9 फेब्रुवारी (चेन्नई)
- दुसरा सामना: 13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी (चेन्नई)
- तिसरा सामना: 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी (अहमदाबाद)
- चौथा सामना: 4 मार्च ते 8 मार्च (अहमदाबाद)
- Ind vs Eng | भारतात आल्यानंतर इंग्लंडचा संघ क्वॉरंटाईन; प्रॅक्टिससाठी केवळ 3 दिवस
- IND Vs ENG | इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यांत 'या' भारतीय गोलंदाजाला मिळू शकते संधी
- IND Vs ENG: इंग्लंडचे फिरकीपटू भारतीय खेळपट्टीवर चालणार नाहीत, माजी क्रिकेटरचा दावा
- IND vs ENG: अहमदाबादमध्ये इंग्लंडकडून भारत कधीच हरला नाही, आकडेवारी जाणून घ्या
- IND vs ENG | 107 वर्षांनी इंग्लंडनं परदेशात जिंकल्या सलग 5 कसोटी मालिका; टीम इंडिया विजयी घौडदौड रोखणार?