IND vs ENG: परदेशात भारतीय गोलंदाज ठरतायेत अपयशी, सलग तिसऱ्यांदा कसोटी सामना गमावला!
India tour of England: इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅम (Birmingham) येथे खेळण्यात आलेल्या रिशेड्युल कसोटी सामन्यात भारताला (ENG vs IND) लाजीरवाण्या पराभावाला सामोरे जावा लागलंय.
India tour of England: इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅम (Birmingham) येथे खेळण्यात आलेल्या रिशेड्युल कसोटी सामन्यात भारताला (ENG vs IND) लाजीरवाण्या पराभावाला सामोरे जावा लागलंय. बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात भारतानं 378 धावांचं विशाल लक्ष्य देऊनही इंग्लंडच्या संघानं सात विकेट्स राखून विजय मिळवला. इंग्लंडच्या विजयात माजी कर्णधार जो रूट आणि यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोनं महत्वाची भूमिका बजावली. महत्वाचं म्हणजे, परदेशात चांगलं प्रदर्शन करून दाखवण्यास भारतीय गोलंदाज अपयशी ठरत आहेत. ज्यामुळं भारतानं परदेशात सलग तिसरा कसोटी सामना गमावला आहे.
भारतानं दिलेल्या 378 धावांचं लक्ष्य इंग्लंडच्या संघानं 76.4 षटकात पूर्ण केलं. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाज विकेट घेण्यासाठी धडपड करताना दिसले. कसोटी क्रिकेटमध्ये 200 हून अधिक धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी संघाला संघर्ष करावा लागतो. मात्र, असं असतानाही इंग्लंडच्या संघानं सात विकेट्स राखून भारताचा पराभव केला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी 207.5 षटक टाकले. ज्यात त्यांनी प्रति षटक 4.01 सरासरीनं धावा दिल्या.
परदेशात भारताचा सलग तिसरा पराभव
परदेशी भूमीवर भारतीय संघाचा हा सलग तिसरा पराभव आहे. याआधी जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताला दोन सामने गमवावे लागले होते. जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं डीन एल्गरच्या शानदार 96 धावांच्या जोरावर सात विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर केपटाऊन कसोटी सामन्यात भारतीय संघ 212 धावांचं लक्ष्य रोखू शकला नव्हता. या सामन्यातही भारताला सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला.
परदेशी भूमीवर भारताची मागील तीन कसोटी सामन्यातील कामगिरी
क्रमांक | सामना | निकाल | षटक |
1 | जोहान्सबर्ग कसोटी सामना | इंग्लंडचा सात विकेट्सनं विजय | 76.4 |
2 | केपटाऊन कसोटी सामना | दक्षिण आफ्रिकेचा सात विकेट्सनं विजय | 63.3 |
3 | बर्मिंगहॅम कसोटी सामना | दक्षिण आफ्रिकेचा सात विकेट्सनं विजय | 67.4 |
हे देखील वाचा-