ENG vs IND: ‘बझबॉल’ रणनीती आहे तरी काय? तीन दिवस बॅकफूटवर राहूनही कसा जिंकला इंग्लंड!
What is BazBall: बर्मिंगहॅमच्या (Birmingham) एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर (Edgbaston) इंग्लंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या कसोटी सामन्यात भारताला (ENG vs IND) सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागलाय.
What is BazBall: बर्मिंगहॅमच्या (Birmingham) एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर (Edgbaston) इंग्लंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या कसोटी सामन्यात भारताला (ENG vs IND) सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागलाय. भारतानं दिलेल्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघानं एकहाती विजय मिळवला. विशेष म्हणजे, या सामन्यात तीन दिवस बॅकफूटवर राहिल्यानंतरही इंग्लंडच्या संघानं जोरदार कमबॅक करत सामना जिंकला. त्यानंतर इंग्लंडच्या संघानं बझबॉल रनणीतीचा वापर करून भारताला पराभूत केलं, अशी सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. बझबॉल रनणीती नेमकी काय आहे? या रणनीतीचा इंग्लंडच्या मुख्यप्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम काय संबंध आहे? हे जाणून घेऊया.
ब्रँडन मॅक्युलमकडं इंग्लंडच्या मुख्यप्रशिक्षकाची जबाबदारी सोपवल्यानंतर संघाच्या रणनीतीत अनेक पाहायला मिळाले. बझबॉल विचारधारेचा जनक म्हणून ब्रँडन मॅक्युलमला ओळखलं जातं. बझ हे मॅक्युलमचे टोपण नाव आहे. तेव्हापासून पुढं बझबॉल असं नाव तयार झालंय.
बझबॉल म्हणजे काय?
ब्रँडन मॅक्युलमनं त्याच्या कसोटी कारकिर्दीत आक्रमक फलंदाजीच्या जोरावर नेहमी विरोधी संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय. त्याची ही रणनीती अनेकदा त्याच्यासाठी फायद्याची ठरली आहे. मॅक्युलमच्या मते कसोटी क्रिकेट खेळण्याची पद्धतीत आता बदल करायला पाहिजे. दरम्यान, ब्रँडन मॅक्युलमच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडचा संघ कसोटी क्रिकेट खेळत आहे. इंग्लंडनं न्यूझीलंडविरुद्ध नुकतीच पार पडलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी सामन्यात 3-0 नं विजय मिळवला. या मालिकेत इंग्लंडच्या संघानं बझबॉल रणनीतीचा वापर करत न्यूझीलंडच्या संघाला क्लीन स्वीप दिला होता. त्यानंतर भारताविरुद्धही बर्मिंगहॅम कसोटीत त्याच रणनीतीचा वापर करत सामना जिंकला.
भारतानं सात विकेट्सनं सामना गमावला
बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, भारताचा पहिला डाव 416 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर भारतानं भेदक गोलंदाजी करत इंग्लंडच्या संघाला पहिल्या डावात 284 धावांवर रोखलं आणि 134 आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला 245 धावांपर्यंत मजल मारता आली. अखेरच्या डावात इंग्लंडला 378 धावांची गरज असताना जो रूट (142 धावा) आणि जॉनी बेअरस्टोनं (114 धावा) दमदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
हे देखील वाचा-