एक्स्प्लोर

तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या प्लेईंग 11 ची घोषणा, एका बदलासह उतरणार मैदानात

India vs England 3rd Test : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Saurashtra Cricket Association Stadium Rajkot) होणार आहे.

India vs England 3rd Test : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Saurashtra Cricket Association Stadium Rajkot) होणार आहे. पाच सामन्याची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी राजकोट (IND vs ENG)  कसोटी सामना महत्वाचा ठरणार आहे. इंग्लंड संघाने एक दिवस आधीच तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्लेईंग 11 ची घोषणा केली आहे. इंग्लंडने प्लेईंग 11 मध्ये एक बदल केलाय. इंग्लंडने शोएब बशीर याला प्लेईंग 11 मधून बाहेर बसवलेय. 

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अधिकृत संकेतस्थळावर प्लेईंग  11 ची माहिती दिली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डानं राजकोट कसोटी सामन्यापूर्वी आपल्या संघाची घोषणा केली आहे. फिरकी गोलंदाज शोएब बशीर याला आराम देण्यात आलाय. त्याच्या जागी मार्क वूड याला संधी देण्यात आली आहे. भारतीय फलंदाजांना आता जेम्स अँडरसन आणि मार्क वूड यांचा सामना करावा लागणार आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याचा राजकोट कसोटी सामना 100 वा असेल. त्यामुळे इंग्लंडसाठी हा सामना अतिशय महत्वाचा आहे. 

मार्क वूडची कामगिरी कशी राहिली ?

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड याने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. 32 कसोटी सामन्यात 104 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान चार वेळा पाच विकेट घेण्याचा पराक्रम ेकलाय. मूड याने तळाला फलंदाजीत योगदानही दिलेय. त्याच्या नावावर एका अर्धशतकाची नोंद आहे.  

शोएब बशीर संघाबाहेर -

इंग्लंड संघाने शोएब बशीर या युवा फिरकी गोलंदाजाला संघाबाहेर ठेवलेय. त्याच्या जागी मार्क वूड याला संधी देण्यात आली आहे. बशीर याला बाहेर बसवण्यात आल्याचं कारण सांगण्यात आले नाही. 

भारताविरोधात इंग्लंडची प्लेईंग 11 - England Men's XI

1. जॅक क्रॉली Zak Crawley
2. बेन डकेट Ben Duckett
3. ओली पोप Ollie Pope
4. जो रुट Joe Root
5. जॉनी बेयरस्टो Jonny Bairstow
6. बेन स्टोक्स Ben Stokes (C)
7.  बेन फोक्स Ben Foakes
8.रेहान अहमद Rehan Ahmed
9. टॉप हर्टली Tom Hartley
10. मार्क वूड Mark Wood
11. जेम्स अँडरसन James Anderson

इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित 3 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाचा स्क्वॉड 

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल, , रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जाडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप, देवदत्त पड्डीकल.

1st टेस्ट : 25-29 जानेवारी, हैदराबाद (इंग्लंड 28 धावांनी विजय) 
2nd टेस्ट : 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टनम (टीम इंडियाचा 106 धावांनी विजय) 
3rd टेस्ट : 15-19 फेब्रुवारी, राजकोट 
4th टेस्ट : 23-27 फेब्रुवारी, रांची 
5th टेस्ट : 7-11 मार्च, धर्मशाला

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rajesh Kshirsagar: विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
Vasai-Virar Municipal Election 2026: सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
धमकी देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना निलंबित करा, उद्धव ठाकरेंची मागणी; निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
धमकी देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना निलंबित करा, उद्धव ठाकरेंची मागणी; निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
'कदाचित ही शरद पवारांची राजकीय खेळी वा गरजही असेल, पण समाजविघातक..' बारामतीत अदानींच्या ग्रँड वेलकमनंतर शरद पवार इन्स्पायर फेलोशिपचे मार्गदर्शक पद लेखकांनी सोडलं!
'कदाचित ही शरद पवारांची राजकीय खेळी वा गरजही असेल, पण समाजविघातक..' बारामतीत अदानींच्या ग्रँड वेलकमनंतर शरद पवार इन्स्पायर फेलोशिपचे मार्गदर्शक पद लेखकांनी सोडलं!

व्हिडीओ

Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajesh Kshirsagar: विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
Vasai-Virar Municipal Election 2026: सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
धमकी देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना निलंबित करा, उद्धव ठाकरेंची मागणी; निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
धमकी देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना निलंबित करा, उद्धव ठाकरेंची मागणी; निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
'कदाचित ही शरद पवारांची राजकीय खेळी वा गरजही असेल, पण समाजविघातक..' बारामतीत अदानींच्या ग्रँड वेलकमनंतर शरद पवार इन्स्पायर फेलोशिपचे मार्गदर्शक पद लेखकांनी सोडलं!
'कदाचित ही शरद पवारांची राजकीय खेळी वा गरजही असेल, पण समाजविघातक..' बारामतीत अदानींच्या ग्रँड वेलकमनंतर शरद पवार इन्स्पायर फेलोशिपचे मार्गदर्शक पद लेखकांनी सोडलं!
Shirdi News: साईबाबांच्या चरणी विक्रमी दान, 9 दिवसात तब्बल 'इतक्या' कोटींची देणगी; आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
साईबाबांच्या चरणी विक्रमी दान, 9 दिवसात तब्बल 'इतक्या' कोटींची देणगी; आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
पिंपरी चिंचवड महापालिका : प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांचा 'असा' सामना रंगणार! उमेदवारांची यादी वाचा एका क्लीकवर
पिंपरी चिंचवड महापालिका : प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांचा 'असा' सामना रंगणार! उमेदवारांची यादी वाचा एका क्लीकवर
Raj Thackeray and Uddhav Thackeray BMC Election Manifesto: शब्द ठाकरेंचा! मुंबईकरांसाठी राज-उद्धव ठाकरेंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर, राज ठाकरे 20 वर्षांनी शिवसेना भवनात
शब्द ठाकरेंचा! मुंबईकरांसाठी राज-उद्धव ठाकरेंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर, राज ठाकरे 20 वर्षांनी शिवसेना भवनात
Baba Ram Rahim: भर निवडणुकीत पॅरोल दिल्यानंतर बलात्कारी बाबा राम रहिमला नवर्षाचं 'स्पेशल गिफ्ट; पुन्हा 40 दिवसांचा पॅरोल मंजूर
भर निवडणुकीत पॅरोल दिल्यानंतर बलात्कारी बाबा राम रहिमला नवर्षाचं 'स्पेशल गिफ्ट; पुन्हा 40 दिवसांचा पॅरोल मंजूर
Embed widget