एक्स्प्लोर

IND vs ENG : राजकोट कसोटीत बुमराहाच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह, कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11

India vs England 3rd Test : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Saurashtra Cricket Association Stadium Rajkot) होणार आहे.

India vs England 3rd Test : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Saurashtra Cricket Association Stadium Rajkot) होणार आहे. पाच सामन्याची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी राजकोट (IND vs ENG)  कसोटी सामना महत्वाचा ठरणार आहे. या महत्वाच्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह खेळण्याची शक्यता कमी आहे. भारतीय संघ राजकोटमध्ये दाखल झालाय, पण संघासोबत जसप्रीत बुमराह नसल्याचं समोर आले आहे. क्रिकबजच्या रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराह सतत सराव सत्रामध्ये गैरहजर राहिलाय.  त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी बुमराह उपलब्ध राहणार का? असा प्रश्न उपस्थित राहिलाय. मध्यक्रम फलंदाजांचामध्ये अनुभवाची कमी असल्यामुळे भारतीय संघ चार गोलंदाजासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. 

सहा दिवसांच्या ब्रेकनंतर भारतीय संघ 11 फेब्रुवारीमध्ये राजकोट येथे दाखल झाला. तेव्हापासूनच भारतीय संघाने सरावास सुरुवात केली. पण आतापर्यंत जसप्रीत बुमराह भारतीय संघासोबत जोडला नाही. क्रिकबजच्या रिपोर्ट्सनुसार, बुधवारी जसप्रीत बुमराह सराव सत्रात सहभागी होऊ शकतो. सुरुवातीच्या रिपोर्ट्सुनासर, जसप्रीत बुमराहला तिसऱ्या कसोटी सामन्यात आराम दिला जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जातोय. पण दुसऱ्या कसोटीनंतर दहा दिवसांचं अंतर आहे. त्यामुळे बुमराह राजकोटमध्ये खेळण्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय. आज याबाबत माहिती मिळण्याची शक्यता आहे. जर तिसऱ्या कसोटीत बुमराह खेळला तर चौथ्या कसोटीत त्याला आराम दिला जाऊ शकतो, असाही काही जणांचा अंदाज आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार का? याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळत नाही. विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या अनुपस्थितीत भारताची फलंदाजी कमकुवत दिसतेय. अशा स्थितीतीमध्ये भारतीय सरफराज खान अथवा देवदत्त पड्डीकल यांना पदार्पणाची संधी णिळू शकतो. अशा स्थितीमध्ये भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरु शकतो. रवींद्र जाडेजाही दुखापतीमधून सावरलाय. त्याशिवाय दोन वेगवान गोलंदाज खेळवतील. मोहम्मद सिराज याचं प्लेईंग 11 मधील निश्चित मानले जातेय. बुमराहच्या खेळण्यावर सस्पेन्स कायम आहे. 

इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित 3 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाचा स्क्वॉड 

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल, , रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जाडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप, देवदत्त पड्डीकल.


टीम इंडिया Vs इंग्लंड टेस्ट सीरीजचं शेड्यूल 

1st टेस्ट : 25-29 जानेवारी, हैदराबाद (इंग्लंड 28 धावांनी विजय) 
2nd टेस्ट : 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टनम (टीम इंडियाचा 106 धावांनी विजय) 
3rd टेस्ट : 15-19 फेब्रुवारी, राजकोट 
4th टेस्ट : 23-27 फेब्रुवारी, रांची 
5th टेस्ट : 7-11 मार्च, धर्मशाला

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Pakistan : पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, विचित्र पद्धतीनं धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
IPL 2026 Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला थेट इशारा दिल्याचा कांगावा... सोशल मीडियावर खळबळ; मुंबई इंडियन्सने फोडला फुगा, दोन शब्दात स्पष्ट उत्तर
हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला थेट इशारा दिल्याचा कांगावा... सोशल मीडियावर खळबळ; मुंबई इंडियन्सने फोडला फुगा, दोन शब्दात स्पष्ट उत्तर
BCCI Naman Awards : BCCIची मोठी घोषणा! अवॉर्ड्समध्ये नवीन चेहरे चमकले, कोणत्या खेळाडूंना मिळाला पुरस्कार?
BCCIची मोठी घोषणा! अवॉर्ड्समध्ये नवीन चेहरे चमकले, कोणत्या खेळाडूंना मिळाला पुरस्कार?

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
Embed widget