IND vs ENG 3rd T20: भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये रंगणार आज तिसरा टी-20 सामना; सामना फ्रीमध्ये कुठे पाहता येणार?, A टू Z माहिती
IND vs ENG 3rd T20 Live Streaming Online: टीम इंडियाने आतापर्यंत खेळलेल्या मालिकेतील दोन्ही सामने जिंकत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

IND vs ENG 3rd T20: भारत आणि इंग्लंड (India vs England 3rd T20) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना आज (28 जानेवारी) रंगणार आहे. राजकोटमधील निरंजन शाह मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा टी-20 सामना खेळवण्यात येईल. सायंकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. टीम इंडियाने आतापर्यंत खेळलेल्या मालिकेतील दोन्ही सामने जिंकत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकल्यास टीम इंडिया मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
A game-changing flick 👌🏻
— BCCI (@BCCI) January 26, 2025
A number "72" coincidence 🤔
A thrilling Chepauk Chase 🔝
..In the words of "Won"der Men - Tilak Varma & Ravi Bishnoi 😎
WATCH 🎥🔽 - By @28anand & @mihirlee_58 #TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank
राजकोटमध्ये टीम इंडियाचा विक्रम-
आतापर्यंत टीम इंडियाने राजकोटच्या मैदानावर एकूण 5 सामने खेळले आहेत, त्यापैकी 4 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने येथे फक्त 1 सामना गमावला आहे. 2020 पासून टीम इंडियाने या मैदानावर एकही सामना गमावलेला नाही.
भारत आणि इंग्लंडचा सामना कुठे पाहता येणार?
सामना : सायंकाळी 7 पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स
लाइव्ह स्ट्रीमिंग : हॉटस्टार
टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ-
सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रमनदीप सिंग, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल.
टी-20 मालिकेसाठी इंग्लंडचा संघ-
जॉस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिलिप सॉल्ट, मार्क वूड.
आतापर्यंत मालिका कशी राहिली?
टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना 7 विकेट्सने जिंकला होता. यानंतर, टीम इंडियान दुसरा सामना 2 विकेट्सने जिंकला. हा सामना चेन्नईमध्ये खेळवण्यात आला. जर आपण या मालिकेतील दोन सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंबद्दल बोललो तर इंग्लंडचा जॉस बटलर अव्वल स्थानावर आहे. बटलरने 2 सामन्यात 113 धावा केल्या आहेत. तर तिलक वर्माने 2 सामन्यात 91 धावा केल्या आहेत.
The Passion
— BCCI (@BCCI) January 25, 2025
The Pride and
The Love for the game 💙#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank | @TilakV9 pic.twitter.com/MfWleF9gvv
संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
