![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs ENG 1st ODI Score Live : रोहितचं अर्धशतक, भारताचा इंग्लंडवर 10 विकेट्सनी विजय
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज लंडनच्या केनिंग्टन ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.
LIVE
![IND vs ENG 1st ODI Score Live : रोहितचं अर्धशतक, भारताचा इंग्लंडवर 10 विकेट्सनी विजय IND vs ENG 1st ODI Score Live : रोहितचं अर्धशतक, भारताचा इंग्लंडवर 10 विकेट्सनी विजय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/9b095e5326f694ef48c3b77294a44f681657623156_original.jpg)
Background
India vs England Live : आज भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. आज पहिलाच सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. याआधी भारताने तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला 2-0 ने मात दिली असून आता एकदिवसीय सामन्यातही भारत विजय मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. आज पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवणारा संघ मालिकेत 1-0 ने आघाडी घेणार असल्याने आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे, ज्यामुळे एक चुरशीचा सामना क्रिकेटरसिकांना पाहायला मिळू शकतो.
लंडनच्या केनिंग्टन ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर आज सामना होत असून या ठिकाणची खेळपट्टी सपाट असल्याने फलंदाजांना अधिक फायदा आहे. म्हणूनच आज एक मोठी धावसंख्या उभी राहू शकते. ज्यामुळे क्रिकेटप्रेमींना एक हाय वोल्टेज सामना अनुभवायला मिळू शकतो. सर्व क्रिकेट प्रकारच्या सामन्यात याठिकाणी मोठी धावसंख्या होताना दिसून आलं आहे.आजची खेळपट्टी पाहता फिरकीपटूंना अधिक फायदा होण्याची शक्यता असल्याने भारत आपले अव्वल दर्जाचे फिरकीपटू संघात नक्कीच ठेवेल.
दोन्ही संघाची अंतिम 11
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, मोहम्मद शमी
इंग्लंडचा संघ : जेसन रॉय, जोस बटलर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जो रुट, मोईन अली, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड विली, आर. टोप्ले, क्रेग ओव्हरटन, ब्रायडन कार्स
हे देखील वाचा-
IND vs ENG : भारत 10 विकेट्सनी विजयी
आधी बुमराह-शमी जोडीने भेदक गोलंदाजी केल्यावर रोहित आणि धवन जोडीने नाबाद शतकी भागिदारी करत भारताला 10 विकेट्सनी विजय मिळवून दिला आहे.
भारत vs इंग्लंड: 18.4 Overs / IND - 114/0 Runs
भारत vs इंग्लंड: 18.3 Overs / IND - 110/0 Runs
भारत vs इंग्लंड: 18.2 Overs / IND - 109/0 Runs
भारत vs इंग्लंड: 18.1 Overs / IND - 103/0 Runs
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)