IND vs BAN: नो बॉल किंवा डेड बॉलही नाही, पण तरीही क्लीन बोल्ड होऊन श्रेयस अय्यर ठरला नॉटआऊट!
IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरसोबत (Shreyas Iyer) एक अतिशय आश्चर्यकारक घटना घडली.
IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरसोबत (Shreyas Iyer) एक अतिशय आश्चर्यकारक घटना घडली. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज इबादत हुसेनच्या (Ebadot Hossain) गोलंदाजीवर श्रेयस अय्यर क्लीन बोल्ड झाला.पण तरीही त्याला नॉटआऊट घोषित करण्यात आलं. इबादत हुसेनचा चेंडू स्टंप्सवर लागला. पण बेल्स खाली न पडल्यामुळं त्याला जीवनदान मिळालं, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये इबादत हुसेन क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. पण काही क्षणातंच त्यांच्या आनंदावर पाणी फेरलं. इबादत हुसेन चेंडू स्टंप्सला लागला, बेल्सही चमकल्या, पण बेल्स स्पंप्सवरून खाली न पडल्यानं श्रेयस अय्यरला नॉटआऊट घोषित केलं गेलं.
व्हिडिओ-
Shreyas Iyer gets lucky as the bails aren't dislodged.#TestCricket | #INDvsBAN pic.twitter.com/9ZhXi5FYSm
— Priyesh (@Priyesh_py29) December 14, 2022
श्रेयस अय्यरही झाला हैराण
हे पाहून श्रेयस अय्यरही थक्क झाला. सुरुवातीला अय्यरला समजलं की तो बोल्ड झाला आणि त्याचा डाव संपला. पण काही बेल्स जमिनीवर पडली नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. क्रिकेटच्या नियमानुसार, जोपर्यंत जामीन खाली पडत नाही, तोपर्यंत फलंदाजाला आऊट दिलं जाऊ शकत नाही. अय्यर 158 चेंडूत 77 धावांवर खेळत असताना हा प्रकार घडला. तर, इबत हुसेन त्याचं 15 वे षटक टाकत होता.
पहिल्या दिवशी भारताची धावसंख्या 278/6 वर
नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार केएल राहुल (22 धावा) आणि शुभमन गिल (20 धावा) स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर विराट कोहलीही अवघ्या एका धावेवर बाद झाला. भारतानं 48 धावांवर तीन विकेट्स गमावल्या. यानंतर चेतेश्वर पुजारानं संघाचा डाव सावरला.त्याला ऋषभ पंतचीही चांगली साथ मिळाली.भारताच्या डावातील 32 षटकात ऋषभ पंतच्या रुपात भारताला चौथा धक्का लागला. तो 46 धावा करून बाद झाला.त्यानतंर चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यरनं संघाची धावसंख्या पुढं नेली. अखेरच्या सत्रात तैजूल इस्लामनं चेतेश्वर पुजाराला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.चेतेश्वर पुजारानं 90 धावांची उत्कृष्ट खेळी केली. दरम्यान, पहिल्या दिवशीच्या अखेरच्या चेंडूवर मेहंदी हसननं अक्षर पटेलला बाद केलं. श्रेयस अय्यर नाबाद 82 धावांसह क्रिजवर उभा आहे. पहिल्या दिवसाखेर भारतानं 6 विकेट्सच्या मोबदल्यात धाव फलकावर 278 धावा लावल्या आहेत. बांगलादेशकडून तैजूल इस्लामनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, मेहंदी हसननं दोन विकेट्स घेतल्या.याशिवाय, खालीद अहमदच्या खात्यात एक विकेट जमा झाली.
हे देखील वाचा-