एक्स्प्लोर

PMRDA: पीएमआरडीएचा विकास आराखडा अखेर रद्द; 'त्या' 23 गावांचा डीपी तयार करण्याची जबाबदारी पुणे महापालिकेकडे?

PMRDA: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) वादग्रस्त ठरलेला प्रारूप विकास आराखडा (डीपी) अखेर राज्य सरकारने रद्द केला आहे.

Show Quick Read
Key points generated by AI, verified by newsroom
  • राज्य सरकारने पीएमआरडीएचा वादग्रस्त ठरलेला विकास आराखडा रद्द केला.
  • या रद्द झालेल्या आराखड्यावर सुमारे 40 कोटी रुपये खर्च झाले.
  • पुणे महापालिकेत समाविष्ट 23 गावांचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी महापालिकेकडे जाणार?
  • महापालिकेने या कामासाठी शासनाकडे नियोजन प्राधिकरणाची मागणी केली आहे.

PMRDA: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) वादग्रस्त ठरलेला प्रारूप विकास आराखडा (डीपी) अखेर राज्य सरकारने रद्द केला आहे. शनिवारी (दि. 27) यासंबंधीची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली. त्यामुळे पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी पुणे महापालिकेकडे दिली जाणार का? याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

या आराखड्याच्या तयार करण्यात पीएमआरडीएने सिंगापूरमधील एका कंपनीला सुमारे 40 कोटी रुपये दिले होते. मात्र, हा आराखडा रद्द झाल्याने हा खर्च वाया गेला आहे. 2015 साली पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसह सात नगरपरिषदा आणि 842 गावांचा समावेश करून नियोजनबद्ध विकासासाठी पीएमआरडीएची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर पीएमआरडीएला नियोजन प्राधिकरण म्हणून मान्यता देत विकास आराखडा तयार करण्याचे अधिकार देण्यात आले.

2021 मध्ये प्रारूप विकास आराखडा जाहीर (Draft development plan announced by PMRDA in 2021)

पीएमआरडीएने 2021 मध्ये प्रारूप विकास आराखडा जाहीर केला होता. या आराखड्यावर तब्बल 67 हजार हरकती व सूचना प्राप्त झाल्या. त्याच दरम्यान, 23 गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे या गावांसाठी विकास आराखडा तयार करण्याचा अधिकार पीएमआरडीएकडे नसून, पुणे महापालिकेकडे आहे, असा दावा भाजपने केला होता.

राज्य सरकारकडून डीपी रद्द करण्याचा निर्णय (State government decides to cancel PMRDA DP)

मात्र, त्या वेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असल्याने भाजपची ही मागणी फेटाळण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर काही संस्थांनी पीएमआरडीएच्या अधिकाराविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने मार्च 2023 मध्ये या प्रकरणावर अंतरिम स्थगिती दिली होती. शेवटी, मुख्यमंत्री तथा पीएमआरडीए अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्य सरकारने हा डीपी रद्द करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अधिसूचना शनिवारी काढण्यात आली.

महापालिकेचे शासनाला पत्र (Pune Municipal Corporation letter to Government)

पीएमआरडीएने आराखडा रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर, पुणे महापालिकेने समाविष्ट 23 गावांसाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी महापालिकेने सुमारे एक महिन्यापूर्वी राज्य शासनाला पत्र पाठवून, 23 गावांचा आराखडा तयार करण्यासाठी पुणे महापालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी केली आहे. मात्र, अद्याप शासनाकडून या मागणीवर कोणताही निर्णय झालेला नाही. आता याबाबत काय निर्णय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आणखी वाचा 

Nilesh Ghaywal London Escape: पुण्यातील गंभीर गुन्ह्यामुळे पासपोर्ट मिळण्यामध्ये अडचण; निलेश घायवळने लढवली शक्कल, या ठिकाणचा पत्ता दिल्याची माहिती समोर

महत्त्वाच्या बातम्या

पुणे महापालिकेत गिफ्टच्या बॉक्सची पिशवी घेऊन अज्ञात व्यक्तीचा शिरकाव, व्हिडिओ व्हायरल; आयुक्तांकडे कारवाईची मागणी
पुणे महापालिकेत गिफ्टच्या बॉक्सची पिशवी घेऊन अज्ञात व्यक्तीचा शिरकाव, व्हिडिओ व्हायरल; आयुक्तांकडे कारवाईची मागणी
Pune Metro Line 3 PM Modi : आधी देवेंद्रजी मुख्यमंत्री, मग मी झालो, देवेंद्रजी पुन्हा आले; आम्ही पुण्यात विकासाची गंगा वाहत ठेवली, अजिदादांचाही सिंहाचा वाटा: एकनाथ शिंदे
आधी देवेंद्रजी मुख्यमंत्री, मग मी झालो, देवेंद्रजी पुन्हा आले; आम्ही पुण्यात विकासाची गंगा वाहत ठेवली, अजिदादांचाही सिंहाचा वाटा: एकनाथ शिंदे
Payal Pawar Zhambre Death Case Pune: लग्नावेळी 50 तोळं सोनं, 25 लाख रोख...; पायल पवार-झांबरे मृत्यू प्रकरणात हादरवून टाकणारी माहिती
लग्नावेळी 50 तोळं सोनं, 25 लाख रोख...; पायल पवार-झांबरे मृत्यू प्रकरणात हादरवून टाकणारी माहिती
Payal Pawar Zhambre Death Case Pune: भावाला 4 शब्दांचा मेसेज आणि मोबाईल बंद; किचनमध्ये पायलचा मृतदेह, घटनेच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं?
भावाला 4 शब्दांचा मेसेज आणि मोबाईल बंद; किचनमध्ये पायलचा मृतदेह, घटनेच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court: एकाच ठिकाणी अनिश्चित काळासाठी आंदोलने करता येणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
एकाच ठिकाणी अनिश्चित काळासाठी आंदोलने करता येणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
District Bank Election Result 2026 पडळकर, लंकेंनी गुलाल उधळला, शंभुराजेंचाही जल्लोष; तीन जिल्हे, तीन बँका, सांगली, सातारा, अहिल्यानगरमध्ये कोणाची सत्ता?
पडळकर, लंकेंनी गुलाल उधळला, शंभुराजेंचाही जल्लोष; तीन जिल्हे, तीन बँका, सांगली, सातारा, अहिल्यानगरमध्ये कोणाची सत्ता?
Gokul Election: गोकुळ अध्यक्ष निवडी बाबतीत वाढलेल्या घडामोडीनंतर महायुतीमधील अंतर्गत नाराजी उफाळली
गोकुळ अध्यक्ष निवडी बाबतीत वाढलेल्या घडामोडीनंतर महायुतीमधील अंतर्गत नाराजी उफाळली
Satara District Bank Election Result 2026: राज्यात महायुती, साताऱ्यात सत्तासंघर्ष कायम; 21 पैकी कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा? DCC बँकेच्या अध्यक्षपदासाठी नवं राजकीय गणितं
राज्यात महायुती, साताऱ्यात सत्तासंघर्ष कायम; 21 पैकी कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा? DCC बँकेच्या अध्यक्षपदासाठी नवं राजकीय गणितं
पुणे महापालिकेत गिफ्टच्या बॉक्सची पिशवी घेऊन अज्ञात व्यक्तीचा शिरकाव, व्हिडिओ व्हायरल; आयुक्तांकडे कारवाईची मागणी
पुणे महापालिकेत गिफ्टच्या बॉक्सची पिशवी घेऊन अज्ञात व्यक्तीचा शिरकाव, व्हिडिओ व्हायरल; आयुक्तांकडे कारवाईची मागणी
Sangola Crime News: सांगोल्यात भाजप पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या, 7 दिवसांनंतरही कारवाई होईना; कुटुंबीयांचा संताप, शिवसेनेच्या नेत्यावर आरोप
सांगोल्यात भाजप पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या, 7 दिवसांनंतरही कारवाई होईना; कुटुंबीयांचा संताप, शिवसेनेच्या नेत्यावर आरोप
सोलापूर जिल्हा बँक निवडणूक, अकलूजला धक्का; रणजिसिंह मोहिते पाटलांसह भाजपच्या प्रशांत परिचारकांचाही अर्ज बाद
सोलापूर जिल्हा बँक निवडणूक, अकलूजला धक्का; रणजिसिंह मोहिते पाटलांसह भाजपच्या प्रशांत परिचारकांचाही अर्ज बाद
शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देत संख्याबळ फिरवणार असतील, तर मग निवडणुका घ्यायच्या कशाला? लोकांच्या मताचा काय अर्थ? गोकुळमध्ये मागच्या दारानं सत्ता काबीज करण्यावर सतेज पाटलांची थेट विचारणा
शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देत संख्याबळ फिरवणार असतील, तर मग निवडणुका घ्यायच्या कशाला? लोकांच्या मताचा काय अर्थ? गोकुळमध्ये मागच्या दारानं सत्ता काबीज करण्यावर सतेज पाटलांची थेट विचारणा
Embed widget