IND vs AUS, 2nd T20 Playing 11: बुम बुम बुमराह इज बॅक! ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी20 मध्ये संघात पुनरागमन, पाहा दोन्ही संघाची अंतिम 11
India vs Australia T20 : आज नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये दुसरा टी20 सामना खेळवला जात आहे. या सामन्यात नेमके कोणते खेळाडू मैदानात उतरत आहेत ते पाहूया...
India vs Australia Playing 11 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia ) दुसऱ्या टी20 सामन्यांत नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या सामन्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने संघात बऱ्याच काळानंतर पुनरागमन केलं आहे. दुखापतीमुळे बराच काळ संघाबाहेर असणारा संघा या मालिकेसाठी संघात आहे. पण सलामीच्या सामन्यात तो खेळला नाही. उमेश यादवा संधी देण्यात आली होती, पण आता दुसऱ्या सामन्यात फायनली बुमराह संघात परतला आहे.
आज सामना पार पडणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघाच्या प्लेयिंग 11 चा विचार करता भारतीय संघा जसप्रीत बुमराहचा एक मोठा बदल केला आहे. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) अखेर मैदानात परतला आहे. उमेश यादवच्या जागी त्याला संधी देण्यात आली आहे. पहिल्या सामन्यात उमेशला बऱ्याच काळानंतर संधी दिली होती, पण त्याला खास कामगिरी करता आली नाही. अखेर आज बुमराह परत संघात आला आहे. तसंच भुवनेश्वर कुमारला बसवत ऋषभ पंतला संघात घेण्यात आलं आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाने दोन बदल केले आहेत. नथन एलिस दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्याजागी डॅनियल सॅम्सला संधी देण्यात आली आहे.जोस इंगलिसच्या जागी सीन एबॉट खेळत आहे. तर नेमकी दोन्ही संघाची अंतिम 11 कशी आहे ते पाहूया...
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), ऋषभ पंत, अक्षर पटेल, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलिया संघ - आरोन फिंच (कर्णधार), सीन एबॉट, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), टिम डेविड, कॅमरून ग्रीन, एडम झम्पा, पॅट कमिन्स, जोश हेजलवुड, डॅनियल सॅम्स.
🚨 Team News 🚨
— BCCI (@BCCI) September 23, 2022
2⃣ changes for #TeamIndia as @RishabhPant17 & @Jaspritbumrah93 are picked in the team. #INDvAUS
Follow the match ▶️ https://t.co/LyNJTtkxVv
A look at our Playing XI 🔽 pic.twitter.com/Lgh5KVZ95L
हे देखील वाचा-