IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
India vs South Africa ODI Series Schedule: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका संपल्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु होणार आहे.

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामने, तीन एकदिवसीय सामने आणि पाच टी 20 सामन्यांची मालिका होणार आहे. सध्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी गुवाहाटीत सुरु आहे. कोलकाता कसोटी दक्षिण आफ्रिकेनं जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेकडून संघ जाहीर करण्यात आले आहेत.
India vs South Afria ODI Series : भारत दक्षिण आफ्रिका वनडे मालिका
भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाकडून वनडे मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आले आहेत. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्यानं केएल राहुलला कॅप्टन करण्यात आलं आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं पुन्हा रोहित शर्माला संधी देण्याऐवजी केएल राहुलला कर्णधार केलं. केएल राहुल 2023 पर्यंत कसोटी, वनडे आणि टी 20 मध्ये तो उपकर्णधार होता. तर, दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेंबा बावुमा असेल. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर हे दुखापतग्रस्त आहेत. तर, बीसीसीआयच्या निवड समितीनं जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल या तिघांना विश्रांती दिली आहे. रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड यांना पुन्हा संधी मिळाली आहे.
वनडे मालिकेचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पाहणार?
कसोटी मालिकेप्रमाणं एकदिवसीय सामन्यांचं टीव्हीवरील थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टस नेटवर्कवरुन केलं जाईल. तर, मोबाईलवर मॅच पाहायचं असल्यास जिओहॉटस्टारवर पाहावी लागेल. एकदिवसीय सामन्यांना दुपारी दीड वाजता सुरुवात होईल. पहिली मॅच रांची, दुसरी मॅच रायपूर आणि तिसरी मॅच विशाखापट्टणम येथे होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ - टेम्बा बावुमा (कॅप्टन), ओटनील बार्टमॅन, कॉर्बिन बॉश, मॅथ्यू ब्रीट्जके, डेवाल्ड ब्रेविस, नांद्रे बर्गर, क्विंटन डिकॉक, टोनी डी जोर्जी, रुबिन हरमन, केशव महाराज, मार्को यानसेन, एडन मार्कराम, लुंगी नगिदी, रेयान रिकेल्टन आणि प्रेनेलन सुब्रेयन.
भारत - रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, केएल राहुल, रिषभ पंत, वाशिंगटन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, ऋतुराज गायकवाड़, हर्षित राणा, ध्रुव जुरेल, प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंह.
भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचं वेळापत्रक
पहली वनडे मॅच- 30 नोव्हेंबर- रांची
दुसरी वनडे मॅच - 3 डिसेंबर- रायपूर
तिसरी वनडे मॅच- 6 डिसेंबर- विशाखापट्टणम



















