Rohit Sharma New Record : भारतीय कर्णधार रोहित शर्मा बनला सिक्सर किंग, मार्टीन गप्टिलला मागे टाकत केला नवा रेकॉर्ड
IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नवा रेकॉर्ड केला आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज बनला आहे.
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात पार पडलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात (IND vs AUS) भारताने 6 विकेट्सनी विजय मिळवला. यावेळी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाबाद 46 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. विशेष म्हणजे त्याने सामन्यात 4 षटकार ठोकत एका मोठ्या रेकॉर्डला गवसणी घातली आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाच्या यादीत रोहित शर्मा अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याने 176 षटकार पूर्ण करत पहिलं स्थान गाठलं आहे. त्याने न्यूझीलंडचा तडाखेबाज फलंदाज मार्टिन गप्टिलला (172 षटकार) मागे टाकलं आहे.
The Indian skipper goes to the top of an elite list during the Nagpur T20I 👌🏻
— ICC (@ICC) September 23, 2022
Details 👇🏻#INDvAUS | 📝 Scorecard: https://t.co/qNZMmN8MGZhttps://t.co/JGBgvcv7Tx
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये रोहित शर्माने 138 सामन्यांत 176 षटकार ठोकले आहेत. या यादीत मार्टिन गप्टिल 172 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल (124 षटकार) तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत 120 षटकारांसह इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गन चौथ्या क्रमांकावर आहे. तर,ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच 119 षटकारांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार-
क्रमांक | फलंदाज | देश | षटकार |
1 | रोहित शर्मा | भारत | 176 |
2 | मार्टिन गप्टिल | न्यूझीलंड | 172 |
3 | ख्रिस गेल | वेस्ट इंडीज | 124 |
4 | इयॉन मॉर्गन | इंग्लंड | 120 |
5 | आरोन फिंच | ऑस्ट्रेलिया | 117 |
रोहित शर्माची यंदाच्या वर्षातील कामगिरी
रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीचा विचार करता, त्यानं आतापर्यंत 138 सामन्यात 32.53 च्या सरासरीनं 3677 धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्याच्या बॅटीतून 28 अर्धशतकं तर 4 शतकं झळकली आहेत. तर, त्याची सर्वोत्तम धावसंख्या 118 इतकी आहे. या वर्षीही रोहितनं आपला कमाल फॉर्म कायम ठेवला आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियानंतरदक्षिण आफ्रिकेशी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत रोहित शर्माच्या बॅटमधून आणखी दमदार खेळी पाहायला मिळू शकतात.
हे देखील वाचा-