IND Vs AUS, Match Highlights : भारताचा ऑस्ट्रेलियावर सहा विकेटने विजय
IND vs AUS World Cup 2023 LIVE Score: चेन्नईच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सलामीची लढाई होणार आहे.
LIVE
Background
India vs Australia Live Score, World Cup 2023 : विश्वचषक 2023 स्पर्धेतील (ODI World Cup 2023) टीम इंडियाच्या (Team India) मोहिमेला आजपासून चेन्नईत सुरुवात होत आहे. टीम इंडिया (Indian Cricket Team) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर ही लढाई रंगणार आहे. या दिवसरात्र सामन्यात भारतीय सलामीवीर शुभमन गिलचा सहभाग अनिश्चित आहे. गिलला डेंग्यूचं निदान झाल्यानं तो या सामन्यात खेळणार नसल्याचे संकेत भारतीय कर्णधार रोहित शर्मानं दिले आहेत. अलिकडेच भारतात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियानं 2-1 नं विजय मिळवला होता. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. असं असलं तरीही ऑसी टीमची लढाऊ वृत्ती त्यांना कमी लेखण्याची चूक भारतीय संघ नक्कीच करणार नाही, हे निश्चित. भारतीय फलंदाजी आणि कांगारुंची गोलंदाजी यात प्रामुख्यानं द्वंद्व रंगताना पाहायला मिळणार आहे.
भारतीय क्रिकेट संघानं शेवटचा विश्वचषक 2011 मध्ये जिंकला होता. त्यानंतर दोन विश्वचषक होऊन गेले, पण टीम इंडियाचे हात रिकामेच राहिले. मात्र, यावेळी विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे आहे. अशातच मायभूमीवर होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत 12 वर्षांनंतर पुन्हा विजेतेपदाकडे लक्ष लागलं असून हे लक्ष्य गाठण्यासाठी त्याची मोहीम आजपासून (8 ऑक्टोबर) सुरू होत आहे.
वर्ल्डकपमध्ये टीम इंडियापेक्षा ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा
आज भारतीय क्रिकेट संघ पहिला सामना खेळणार आहे. टीम इंडियाचा आजचा सामना विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघाविरुद्ध होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ आज ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. हा सामना चेन्नईतील चेपॉक येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.
भारतीय क्रिकेट संघानं काही दिवसांपूर्वी एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. अशा परिस्थितीत कांगारूंपेक्षा भारतीय खेळाडूंचं मनोबल अधिक भक्कम असेल. सध्या भारतीय क्रिकेट संघ आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला एकदिवसीय क्रिकेट संघ आहे. दरम्यान, आजचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. चेन्नईतील चेपॉकवर परदेशी संघानं सामने जिंकणं अशक्य असल्याचं बोललं जातं.
विश्वचषकातील पहिल्या सामन्यात कशी असेल प्लेईंग 11?
विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार ओपनर शुभमन गिल आजच्या सामन्यात खेळण्याबाबत साशंकता आहे. शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात गिल खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात गिलऐवजी ईशान किशनला संधी दिली जाऊ शकते. चेपॉकची खेळपट्टी स्पिनर्ससाठी अनुकूल मानली जाते, त्यामुळे टीम इंडिया आजच्या सामन्यात तीन स्पिनर्ससह मैदानात उतरणार आहे. म्हणजेच, जाडेजा आणि कुलदीप यादव यांच्यासोबत आर अश्विनही प्लेइंग-11 मध्ये असू शकतो.
टीम इंडिया (संभाव्य प्लेईंग-11)
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल/ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया (संभाव्य प्लेईंग-11)
डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमरून ग्रीन, एलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, पॅट कमिंस (कर्णधार), जोश हेजलवुड, एडम जम्पा.
भारताचा ऑस्ट्रेलियावर सहा विकेटने विजय
भारताचा ऑस्ट्रेलियावर सहा विकेटने विजय... केएल राहुलने षटकार मारत भारताला मिळवून दिला विजय
भारताला चौथा धक्का
विराट कोहलीच्या रुपाने भारताला चौथा धक्का बसला आहे. विराट कोहली 85 धावांवर बाद झाला आहे. भारत 4 बाद 167 धावा... विराट कोहलीने 116 चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने 85 धावांची खेळी केली. भारताला विजयासाठी 33 धावांची गरज आहे.
भारत विजयाच्या समीप
विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या दीडशतकी भागिदारीच्या जोरावर भारतीय संघ विजयाच्या जवळ पोहचला आहे. भारताला विजयासाठी 35 धावांची गरज
विराट-राहुलची झुंजार खेळी
विराट कोहली आणि केएल राहुल यांनी शतकी भागिदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. भारत तीन बाद 128 धावा.... विराट कोहली 65 आणि राहुल 56 धावांवर खेळत आहेत.
कोहलीनंतर के. एल. राहुलचेही दमदार अर्धशतक...कोहलीसोबत टीम इंडियाच्या डावाला दिला आकार...
कोहलीनंतर के. एल. राहुलचेही दमदार अर्धशतक...कोहलीसोबत टीम इंडियाच्या डावाला दिला आकार...