IND vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या संघाची सरावाला सुरुवात, टीम इंडिया आज मोहालीत पोहचणार!
IND vs AUS: टी-20 विश्वचषकाला सुरू होण्यास एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना आरोन फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ आयसीसी टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारताला कडवी टक्कर देईल.
![IND vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या संघाची सरावाला सुरुवात, टीम इंडिया आज मोहालीत पोहचणार! IND vs AUS: Australia starts practice in Mohali for 1st T20, Rohit Sharma led India player start to arrive gradually IND vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या संघाची सरावाला सुरुवात, टीम इंडिया आज मोहालीत पोहचणार!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/17/6b8aae56e910fd1449a566fb47aebc981663417681653266_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND vs AUS: भारताविरुद्ध मंगळपासून सुरु होणाऱ्या (India vs Australia) तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने सराव सुरू केला आहे. टी-20 विश्वचषकाला सुरू होण्यास एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना आरोन फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ आयसीसी टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारताला कडवी टक्कर देईल. टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीनं दोन्ही संघासाठी ही मालिका महत्त्वाची असेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 20 स्पटेंबरला पहिला टी-20 सामना खेळला जाणार आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर मोठं आव्हान असेल. ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामी फलंदाज डेव्हिड वार्नरला विश्रांती देण्यात आलीय. तर, मिचेल स्टार्क, मिचेश मार्श आणि मार्कस स्टॉयनिस दुखापतीमुळं टी-20 मालिकेतून बाहेर पडले आहेत. दुसरीकडं आशिया चषकात निराशाजनक कामगिरी करणारा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेतून पुनरागमन करण्यासाठी मैदानात उतरतील. तसेच आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी कर्णधार रोहित शर्मा आणि राहुल द्रविडकडं बेस्ट प्लेईंग पारखण्याची संधी असेल. ज
भारत- ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचं वेळापत्रक
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला टी-20 सामना 20 सप्टेंबर रोजी मोहाली येथे होणार आहे. तर दुसरा सामना 23 सप्टेंबर रोजी नागपुरात खेळला जाईल. या दौऱ्यातील तिसरा आणि अंतिम सामना 25 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये यजमानांशी होणार आहे.
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 20 सप्टेंबर 2022 | मोहाली |
दुसरा टी-20 सामना | 23 सप्टेंबर 2022 | नागपूर |
तिसरा टी-20 सामना | 25 सप्टेंबर 2022 | हैदराबाद |
भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया संघ:
आरोन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), अॅश्टन अगर, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅडम झाम्पा, नॅथन एलिस, डॅनियल सेम्स, शॉन अॅबॉट.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)