एक्स्प्लोर

MI Emirates: शेन बॉन्ड एमआय एमिरेट्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी; पार्थिव पटेलवरही मोठी जबाबदारी

MI Emirates New Head Coach: मुंबई इंडियन्सच्या मालिकीच्या एमआय एमिरेट्सच्या संघानं त्यांच्या कोचिंग स्टाफची घोषणा केलीय.

MI Emirates New Head Coach: मुंबई इंडियन्सच्या मालिकीच्या एमआय एमिरेट्सच्या संघानं त्यांच्या कोचिंग स्टाफची घोषणा केलीय. एमआय इमिरेट्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी न्यूझीलंडचा दिग्गज क्रिकेटपटू शेन बॉन्डची (Shane Bond) नियुक्ती करण्यात आलीय. तर, भारताचा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल (Parthiv Patel) एमआय एमिरेट्स संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावेल. या व्यतिरिक्त विनय कुमार (Vinay Kumar), जेम्स फ्रँकलिन (James Franklin) आणि रॉबिन सिंह उथप्पा (Robin Uthappa) यांच्यावरही मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीय. 

ट्वीट-

यूएई टी-20 लीग कधी खेळवली जाणार?
आंतरराष्ट्रीय टी-20 लीग पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. अद्याप या लीगबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा शेड्युल समोर आलेलं नाही. परंतु, असा अंदाज लावला जातोय की दक्षिण आफ्रिका टी-20 लीग आणि यूएई टी-20 सोबत खेळल्या जाऊ शकतात. दक्षिण आफ्रिका टी-20 लीग जानेवारी ते मार्च महिन्यात आयोजित केली जाणार आहे. याचदरम्यान, पाकिस्तान प्रिमिअर लीग देखील खेळली जाणार आहे. 

शेन बॉन्डची प्रतिक्रिया
न्यूझीलंडचा माजी गोलंदाज शेन बॉन्ड हे आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघात गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कामगिरी पाहत होते. मुंबईच्या इंडियन्सच्या एमआय एमिरेट्सच्या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर शेन बॉन्डनं म्हणाला की, एक नवीन संघ बनवणं खूप उस्ताहजनक असतं. मी मुंबईच्या इंडियन्सचा वारसा पुढे घेऊन जाण्यात आणि संघाला यशाच्या उंचीवर घेऊन जाण्यास खेळाडूंना प्रोत्साहित करेल."

महिला जयवर्धनेची मुंबईच्या हेड ऑफ परफॉरमन्स पदी नियुक्ती
मुंबई इंडियन्सच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक महिला जयवर्धनेनं मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिलाय. मुंबई इंडियन्सच्या संघानं त्यांच्यावर नवी जबाबदारी सोपवल्यानं महिला जयवर्धनेनं हा निर्णय घेतलाय. महिला जयवर्धनेंची हेड ऑफ परफॉरमन्स पदी नियुक्ती करण्यात आलीय. यापुढं जयवर्धनें मुंबई फ्रँचायझीच्या 3 संघांच्या प्रदर्शनाला सुधारण्याचे काम पाहतील.

जहीर खान यांच्यावरही मोठी जबाबदारी
महिला जयवर्धने यांच्याव्यतिरिक्त भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान यांच्यावरही मुंबईच्या तिन्ही फ्रँचायझीचे ग्लोबल हेड ऑफ क्रिकेट डेव्हलपमेंट म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. जो खेळाडूंच्या विकासासाठी जबाबदार असेल. याशिवाय, खेळाडूंची प्रतिभा ओळखणं आणि एमआयसाठी एक मजबूत संघ तयार करणे, यासाठी जहीर खान काम करेल. झहीरची ही भूमिका जगभरातील एमआयच्या संघांना मदत करण्यात महत्त्वाची ठरेल.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Custody : वाल्मिकला 7 दिवसांची पोलीस कोठडी, वकिलासह समर्थकांचा राडा | VIDEOPM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदीPankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
Embed widget