एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

India's Tour of Australia: टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची घोषण; पर्थमध्ये पहिली कसोटी, इतर सामने कुठे?

सिडनी मॉर्निंग हेराल्डनं दिलेल्या वृत्तानुसार, ॲडलेडमध्ये मालिकेतील दुसरी कसोटी खेळली जाणार असून ती दिवस-रात्रीची असेल. यानंतर तिसरा सामना ब्रिस्बेनमध्ये होणार आहे. तसेच, मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटीचं आयोजन सुरू राहील.

IND vs AUS 5 Match Test Series 2024-25: टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील बहुप्रतिक्षित कसोटी मालिकेची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. टीम इंडियाचा येत्या वर्षी नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्यावेळी टीम इंडिया ऑसी संघाविरोधात कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळणार आहे. 'सिडनी मॉर्निंग हेराल्ड'नं दिलेल्या वृत्तानुसार, ॲडलेड, ब्रिस्बेन, मेलबर्न आणि सिडनी ही हाय-प्रोफाइल दौऱ्यासाठी ठिकाणे म्हणून निवडली गेली आहेत. 

सिडनी मॉर्निंग हेराल्डनं दिलेल्या वृत्तानुसार, ॲडलेडमध्ये मालिकेतील दुसरी कसोटी खेळली जाणार असून ती दिवस-रात्रीची असेल. यानंतर तिसरा सामना ब्रिस्बेनमध्ये होणार आहे. तसेच, मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटीचं आयोजन सुरू राहील. नव्या वर्षाचा कसोटी सामना सिडनीमध्ये खेळवला जाईल. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं त्याच्या पुढील सीझनचं वेळापत्रक अद्याप निश्चित केलं नसलं तरी, मार्चच्या अखेरीस वेळापत्रकाच्या अंतिम तारखा जाहीर होऊ शकतात. 

2024-25 मध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा 1991-92 नंतर पहिल्यांदाच दोन्ही संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकमेकांशी खेळतील. 1991-92 मध्ये ज्यावेळी कसोटी मालिका खेळवली गेली होती, त्यावेळी ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाचा 4-0 अशा फरकानं पराभव केला होता. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गेल्या 4 कसोटी मालिकेत टीम इंडियानं वर्चस्व राखलं होतं आणि कांगारूंना धूळ चारत कसोटी मालिका आपल्या खिशात घातली होती. गेल्या चारही मालिकांमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. यामध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियन भूमीवर दोन बॅक टू बॅक कसोटी मालिका जिंकल्या आहेत. 2018-19 आणि 2020-21 या दोन्ही वेळी कांगारू संघाचा टीम इंडियाकडून 2-1 अशा मोठ्या फरकानं पराभव करण्यात आला होता. 

टीम इंडियाचं पारडं जड 

टीम इंडियाच्या शेवटच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यानं ॲडलेडमध्ये खराब सुरुवातीनंतर शानदार पुनरागमन केलं. ॲडलेडमध्ये भारतीय क्रिकेट संघ 36 धावांवर बाद झाला. तत्कालीन कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीनंतरही अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं शानदार पुनरागमन केलं. सिडनी कसोटी वाचवण्यासाठी धडपडण्यापूर्वी, टीम इंडियानं मेलबर्नमध्ये एकतर्फी विजय मिळवला आणि नंतर ब्रिस्बेनमध्ये तीन विकेट्सनी धमाकेदार विजय मिळवला होता. 

WTC पॉईंट टेबलमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानी  

सध्याच्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फेरीत टीम इंडियानं एकही मालिका गमावलेली नाही. दोन वेळच्या WTC उपविजेत्यानं गेल्या वर्षी वेस्ट इंडिज दौऱ्यासह या नव्या फेरीत त्यांच्या मोहिमेची सुरुवात केली, जिथे त्यांनी 1-0 असा विजय मिळवला. यानंतर टीम इंडियानं आणखी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. जिथे सलामीचा सामना गमावल्यानंतर भारतीय क्रिकेट संघानं मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. त्यानंतर रोहित ब्रिगेडनं अलिकडेच घरच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा 4-1 नं पराभव केला आणि सध्या ते WTC पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

यालाच म्हणतात, "इट का जबाब पथ्थर से"; पुन्हा एकदा टाईम आऊटचा विवाद, श्रीलंकेनं डिवचलं, बांगलादेशनं सडेतोड उत्तर दिलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Deepak Kesarkar On Eknath Shinde : शिंदेंना योग्य तो मान मिळावा, दिपक केसरकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाणAjit Pawar Gat Mantri list : भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम राहणारSpecial Report : Solapur Voting On Ballet Paper : 'बॅलेट'साठी झेलू 'बुलेट'; मारकडवाडीत चाललंंय काय?Special Report : Mahayuti Mantripad : मंत्रीपदाची परीक्षा..कोण पास, कोण नापास? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
Embed widget