Ind vs Aus 3rd ODI : सिडनीत रोहित अन् कोहलीचा तांडव! तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा मोठा विजय, पण ऑस्ट्रेलियाने 2-1 ने जिंकली मालिका
IND vs AUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडिया पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभूत झाली. त्यामुळे मालिका जिंकण्याची संधी हुकली, आता प्रतिष्ठा जपण्याची लढत रंगणार आहे.
LIVE

Background
India vs Australia Live Score, 3rd ODI Match Latest Updates : पर्थनंतर टीम इंडियाचा अॅडलेडमधील पराभव झाला, सलग दोन सामने गमावल्यामुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेवर ऑस्ट्रेलियाने आधीच शिक्कामोर्तब केलं आहे. आता सिडनीत भारतासमोर एकच लक्ष्य आहे. क्लीन स्वीप टाळायचा आणि इज्जत वाचवायची.
ऑस्ट्रेलियाचा सिडनी क्रिकेट ग्राउंडवरील विक्रम जबरदस्त आहे. त्यांनी या मैदानावर 70 टक्के सामने जिंकले आहेत. भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर, या मैदानावर त्यांचा परफॉर्मन्स फारच निराशाजनक राहिला आहे. इथे झालेल्या 18 सामन्यांत ऑस्ट्रेलियाचा भारताविरुद्धचा पलडा 16-2 असा जड आहे. टीम इंडिया मात्र टी-20 मालिकेआधी या दौऱ्यातील आपला पहिला विजय मिळवण्यासाठी आतुर आहे. सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता सुरू होईल, तर टॉस साडेआठ वाजता होणार आहे.
Ind vs Aus 3rd ODI : सिडनीत रोहित अन् कोहलीचा तांडव! तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा मोठा विजय, पण ऑस्ट्रेलियाने 2-1 ने जिंकली मालिका
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील शानदार भागीदारीमुळे भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा नऊ विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 46.4 षटकांत 236 धावा केल्या. प्रत्युत्तर रोहित शर्माने शतक आणि कोहलीने अर्धशतक केले. या दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे भारताने 38.3 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 237 धावा करून सामना जिंकला. पण, ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली.
Ind vs Aus Live Score 3rd ODI : सिडनीत रोहित शर्माचा 'हिट'शो! ठोकले तुफानी शतक
रोहितने 105 चेंडूत शतक ठोकले, भारताने 200 धावा पूर्ण केल्या.




















