IND vs AUS, 2nd T20I, 1st Inning : मॅथ्यू वेडची चमकदार खेळी, भारतासमोर 91 धावांचं आव्हान, 8 षटकांत पूर्ण कराव लागणार लक्ष्य
India vs Australia T20 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी20 सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी 8 ओव्हर्सचा करण्यात आला आहे.
India vs Australia : नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात पार पडणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia ) दुसऱ्या टी20 सामन्यामध्ये भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर भारताने सुरुवातीला कमाल गोलंदाजी केली, पण ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडने चमकदार खेळी करत 43 धावांची फटकेबाजी करत भारतासमोर 91 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी 8 ओव्हर्सचा करण्यात आला असल्याने भारताला 91 धावा आता 8 षटकात कराव्या लागणार आहेत.
सामन्यात सर्वप्रथम भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे आधीच उशीरा झालेला सामन्यात प्रत्येकी संघाला 8 षटकं खेळायला मिळणार होती. दरम्यान भारताचा अष्टपैलू क्रिकेटर अक्षर पटेलने (Axar Patel) उत्कृष्ट गोलंदाजी करत सुरुवातीपासून ऑस्ट्रेलियन फलंदाजांना तंबूत धाडण्यास सुरुवात केली. अक्षरने सामन्यात महत्त्वपूर्ण असे दोन विकेट घेतले. तर बुमराहने ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचला 31 धावांवर तंबूत धाडलं. ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडने 20 चेंडूत नाबाद 43 धावा केल्याने ऑस्ट्रेलियाने धावसंख्या 90 पर्यंत नेली. ज्यामुळे आता भारताला विजयासाठी 91 धावा आता 8 षटकात कराव्या लागणार आहेत.
Innings Break!
— BCCI (@BCCI) September 23, 2022
Target for #TeamIndia - 9️⃣1️⃣
Our chase coming up shortly.
Scorecard ▶️ https://t.co/LyNJTtl5L3 #INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/nu58uHpWBX
कसे आहेत दोन्ही संघ?
आजच्या सामन्यात दोन्ही संघाच्या अंतिम 11 चा विचार करता भारताने एक मोठा बदल केला आहे. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) अखेर मैदानात परतला आहे. उमेश यादवच्या जागी त्याला संधी देण्यात आली आहे. पहिल्या सामन्यात उमेशला बऱ्याच काळानंतर संधी दिली होती, पण त्याला खास कामगिरी करता आली नाही. अखेर आज बुमराह परत संघात आला आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाने दोन बदल केले आहेत. नथन एलिस दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्याजागी डॅनियल सॅम्सला संधी देण्यात आली आहे.जोस इंगलिसच्या जागी सीन एबॉट खेळत आहे. तर नेमकी दोन्ही संघाची अंतिम 11 कशी आहे ते पाहूया...
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), ऋषभ पंत, अक्षर पटेल, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलिया संघ - आरोन फिंच (कर्णधार), सीन एबॉट, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), टिम डेविड, कॅमरून ग्रीन, एडम झम्पा, पॅट कमिन्स, जोश हेजलवुड, डॅनियल सॅम्स.
हे देखील वाचा-