एक्स्प्लोर
Ind vs AUS 2nd T20 Result : कर्णधार रोहितच्या खेळीच्या जोरावर दुसऱ्या टी20 मध्ये भारत 6 विकेट्सनी विजय, वाचा 10 महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर
IND vs AUS, Match Highlights : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी20 मालिका आता बरोबरीत आली आहे. कारण दुसरा टी20 सामना भारताने 6 विकेट्सनी जिंकला आहे.

Rohit and Virat
IND vs AUS: भारतीय भूमीत सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) टी20 मालिकेत भारताने दुसरा सामना 6 विकेट्सनी जिंकत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. पावसामुळे 8 षटकांचा सामना खेळवण्यात आला. सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजी घेतली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने मॅथ्यू वेडच्या नाबाद 43 धावांच्या जोरावर 91 धावाचं लक्ष्य भारतासमोर ठेवलं. भारताने कर्णधार रोहित शर्माच्या नाबाद 46 धावांच्या मदतीने हे लक्ष्य सहज गाठत 6 विकेट्स आणि 4 चेंडू राखून सामना जिंकला, तर सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...
IND vs AUS 10 महत्त्वाचे मुद्दे-
- सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. आजही नाणेफेक जिंकून भारताने सामना जिंकला आहे.
- सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी 8 ओव्हर्सचा झाला.
- यावेळी ऑस्ट्रेलियाने आधी 90 धावा केल्या. ज्यामुळे विजयासाठी भारताला 8 षटकात 91 धावा करायच्या होत्या. भारताने उत्तम फलंदाजी करत हे लक्ष्य 4 चेंडू आणि 6 विकेट्स राखून पूर्ण केलं.
- सामन्यात सर्वप्रथम म्हणजे नाणेफेक जिंकत भारताने गोलंदाजी घेतली.
- ऑस्ट्रेलियाची सुरुवात खास झाली नाही, भारताचा अष्टपैलू क्रिकेटर अक्षर पटेलने उत्कृष्ट गोलंदाजी करत सुरुवातीपासून ऑस्ट्रेलियन फलंदाजांना तंबूत धाडण्यास सुरुवात केली.
- अक्षरने सामन्यात महत्त्वपूर्ण असे दोन विकेट घेतले. तर बुमराहने ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचला 31 धावांवर तंबूत धाडलं.
- ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडने 20 चेंडूत नाबाद 43 धावा केल्याने ऑस्ट्रेलियाने धावसंख्या 90 पर्यंत नेली.
- 91 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताने हे लक्ष्य सहज पूर्ण केलं. भारताच्या विकेट्स पडल्या पण कर्णधार रोहित शर्माने सुरुवातीपासून टिकून राहत दमदार फटकेबाजी सुरुच ठेवली. त्याने 20 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकार मारत नाबाद 46 धावा केल्या.
- स्टार फलंदाज दिनेश कार्तिक याने शेवटच्या ओव्हरच्या दोन चेंडूत 10 धावा करत भारताचा विजय पक्का केला. ज्यामुळे भारताने 6 आणि 4 चेंडू राखून सामना जिंकला.
- हा सामना जिंकत भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.
हे देखील वाचा-
आणखी वाचा




















